google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मशाल' ठाकरे गटाचीच, निवडणूक चिन्हाविरुद्धची समता पक्षाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

Breaking News

मशाल' ठाकरे गटाचीच, निवडणूक चिन्हाविरुद्धची समता पक्षाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

 मशाल' ठाकरे गटाचीच, निवडणूक चिन्हाविरुद्धची समता पक्षाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  गटाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. 

ठाकरे गटाच्या 'मशाल' चिन्हाविरोधातील समता पक्षाची  याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. म्हणजेच आता आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह हे पेटती मशाल हेच राहणार आहे. 

शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह गोठवलं. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह देत 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव दिलं. तर एकनाथ शिंदे गटाला 'ढाल आणि तलावर' हे निवडणूक चिन्ह देत गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव दिलं होतं.

Post a Comment

0 Comments