दुर्दैवी ! सोलापुरात हायवाने दुचाकीला उडवले, शिक्षिका जागीच ठार
सोलापूर : शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या शिक्षिकेच्या दुचाकीला हायवा या जड वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात शिक्षिका जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास गेंट्याल चौकात लोकसेवा प्रशालेच्या जवळ घडली.
निलोफर मुजावर राहणार सहारा नगर भाग 2 असे मयत शिक्षिकेचे नाव आहे. पोलीस मुख्यालयातील पब्लिक स्कुलमध्ये त्या शिक्षिका असल्याची माहिती मिळाली.
मुजावर या शाळा संपवून आपल्या ज्युपिटर या गाडीवर घरी निघाल्या होत्या. त्या त्या लोकसेवा प्रशालेवर आल्या असता एम एच 13 डी क्यू 5555 या क्रमांकाच्या हायवा ट्रकने जोराची धडक दिली, या धडकेत मयत शिक्षिका गाडीच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्या.
अपघात घडताच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लादेन यांची अँबुलन्स मागवून मृतदेह शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आला. पोलिसांनी हायवा चालकावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान माजी नगरसेवक तौफीक शेख व माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले. या घटनेला जड वाहतूक आणि खराब रस्ते हे कारणीभूत असल्याचे सांगत याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला.


0 Comments