सांगोला तालुका भ्रष्टाचार विरोधी सामाजिक चळवळ संघटना स्थापन
अध्यक्षपदी ज्ञानेश्वर उबाळे, सचिवपदी शिवाजी येलपले, उपाध्यक्षपदी बाबासाहेब वाघमारे, चंद्रकांत खरात तर खजीनदारपदी नवनाथ कुंभार
सांगोला/प्रतिनिधी ः19 ऑक्टोबर रोजी सांगोला तालुक्यातील सामाजिक कार्यकत्यांची बैठक बबन संपत चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये भ्रष्टाचार विरोधी काम करणारी ‘भ्रष्टाचार विरोधी सामाजिक चळवळ’ ही संघटना स्थापन करण्यात आली. बबन संपत चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली खालील पदाधिकार्यांची निवडी करण्यात आल्या. यामध्ये
अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर संभाजी उबाळे, रा. वाकी (शिवणे) ता. सांगोला सचिवपदी शिवाजी भारत येलपले, रा. य.मगेवाडी (अजनाळे) ता. सांगोला,
उपाध्यक्षपदी बाबासाहेब कांतिलाल वाघमारे, रा. सांगोला व चंद्रकांत बाबा खरात, रा. शिवणे, ता. सांगोला यांची निवड करण्यात आली. प्रसिध्दीप्रमुखपदी बाळासाहेब मारूती तळे, रा. य.मंगेवाडी, खजिनदारपदी नवनाथ विठ्ठल कुंभार, रा. वाकी (शिवणे) कार्याध्यक्षपदी हणमंत गोपाळ सरगर, रा. कोळा (कोंबडवाडी),
संघटकपदी प्रविण भोजलिंग बाबर, वाकी (शिवणे) ता. सांगोला यांची निवड झाली आहे. तर सदस्य म्हणून दिलीप भगवान उबाळे, रा. बामणी ता. सांगोला, मुस्तफिा शाबुद्दीन मुलाणी, रा. वाकी (शिवणे) ता. सांगोला, बबन संपत चंदनशिवे, रा. सांगोला ता. सांगोला यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे दिलीप उबाळे यांनी आभार मानले.


0 Comments