google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक, कोणतेही कारण नसताना अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या

Breaking News

धक्कादायक, कोणतेही कारण नसताना अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या

 धक्कादायक, कोणतेही कारण नसताना अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या

 नवी मुंबईतील सेक्टर 15 च्या कोपर खैरणेमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय मुलाचा एका अज्ञात इसमाने दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान या मुलाचा कोणत्या कारणावरून खून करण्यात आला आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजून शकली नाही. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. अचानक घडलेल्या या घटनेने मुलाच्या घरच्यांनी हंबरडा फोडल्याने परिसर सुन्न झाला होता.

साहिल शांताराम गोळे वय(17) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. सेक्टर 15 कोपरखैरणे या भागातच तो राहत होता. साहिलचा सेक्टर 23 कोपरखैरणेमधील भूमिपुत्र या मैदानावर खून करण्यात आला. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या मुलाचा कोणत्या कारणावरून खून करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आला आहे. तसेच परिसराची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगित. 

या अल्पवयीन मुलाचा कोणत्या कारणावरून खून झाला. याचे धागेदोरे काढण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा सज्ज केली आहे. आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत, तर काही नागरिकांना विचारणा केली जात आहे.

Post a Comment

0 Comments