सांगोला तालुक्यातील चेतनसिंह केदार-सावंत यांची सोलापूर जिल्हा टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी निवड
सांगोला : भारत सरकार टेलिफोन सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या शिफारसीनुसार भारतीय जनता पार्टीचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांची सोलापूर जिल्हा टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा भारत सरकार टेलिफोन सल्लागार समितीचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.
भारत सरकार टेलिफोन सल्लागार समितीचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या शिफारसीनुसार भारतीय जनता पार्टीचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांची सोलापूर जिल्हा टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सांगोला तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर चेतनसिंह केदार-सावंत यांनी तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला.
पक्षाने दिलेली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडण्यात चेतनसिंह केदार-सावंत यांचा हातखंडा आहे. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी चेतनसिंह केदार-सावंत यांची सोलापूर जिल्हा टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी निवड करून त्यांना जिल्हा स्तरावर काम करण्याचा संधी दिली आहे.
भारतीय जनता पार्टीचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगोला तालुक्यात भाजपची सक्षम बूथ रचना तयार करून शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख यासह भाजप तालुका कार्यकारणी, युवा मोर्चा तालुका कार्यकारणीच्या निवडी करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी जोमाने काम करण्यास प्रोत्साहन दिले आहे.
कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला अन्नधान्याचे मोफत वितरण, जंतुनाशक फवारणी, मास्क, सॅनिटायझर मोफत देवून सामाजिक बांधिलकी जोपासली. तसेच विद्यार्थांची फी माफ करावी यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या कार्याची दखल घेत
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा भारत सरकार टेलिफोन सल्लागार समितीचे अध्यक्ष रणजितसिंह निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीचे सांगोला तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांची सोलापूर जिल्हा टेलिफोन सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.


0 Comments