google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जीवनसाथी डॉट कॉमने दिला फंडा ; सोलापुरच्या तरुणीला २८ लाखाला घातला गंडा

Breaking News

जीवनसाथी डॉट कॉमने दिला फंडा ; सोलापुरच्या तरुणीला २८ लाखाला घातला गंडा

 जीवनसाथी डॉट कॉमने दिला फंडा ; सोलापुरच्या तरुणीला २८ लाखाला घातला गंडा 

जीवनसाथी डॉट कॉमवर संपर्क साधून एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून पैशाची मागणी करत २८ लाख ८ हजाराला फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना दि.१५ ऑगस्ट २०२२ ते १४ ऑक्टोंबर २०२२ दरम्यान सोलापूरात घडली. याप्रकरणी पीडित तरूणीने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून जनार्दन बसव्वा रेड्डी,बसव्वा रेड्डी,जनार्दन यांची आई (रा.विनायक नगर,सामवेडी शाळेजवळ नितवल्ली,दावणगिरी,कर्नाटक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वरील संशयित आरोपी जनार्दन बसव्वा रेड्डी याने जीवनसाथी डॉट कॉमवर फिर्यादी पीडित तरूणीला संपर्क करून लग्न करतो असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून गुगल पे व आयसीआयसी बँक खात्याच्या माध्यमातून वेळोवेळी २८ लाख ८ हजार रुपये रक्कम घेऊन फसवणूक केली.

त्यानंतर जनार्दन याने पैसे परत न करता फिर्यादी यांच्या वडिलांना मारण्याची धमकी देऊन तसेच त्यांचे वडील व आई यांना देखील पैसे परत देतो असे सांगून विश्वास संपादन करून पैसे परत न करता फसवणूक केली आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई ताकभाते हे करीत आहे.

मूळची सोलापूरची पीडित तरुणी हि पुणे येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून २०१४ सालापासून काम करते.व तिला १५ लाखाचा पॅकेज आहे.त्यावर तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.कोरोनाच्या काळात पीडित तरुणी हि २०२० पासून वर्क फ्रॉम होम करत असल्याने सोलापूर येथील आपल्या राहत्या घरी आई-वडिलांकडे राहून काम करत होती.

जीवनसाथी डॉट कॉमवर जनार्दन रेड्डी नावाच्या इसमाने पीडित तरूणीला रिक्वेस्ट पाठवली.त्यानंतर पाठवलेली रिक्वेस्ट पीडित तरुणीने कोणत्याही प्रकारची चौकशी न करता ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. जनार्दन याने ‘हाय’ म्हणून मेसेज पाठवून तुझा प्रोफाइल खूप आवडला आहे. 

तुला पुढच्या आठवड्यात पाहायला येणार आहे असे म्हणाला.त्यावेळी पीडित तरुणीने विश्वास ठेवून स्वतःचा बायोडाटा पाठवून दिला व हळूहळू संपर्क वाढत पाठवलेली रिक्वेस्टची कधी मिस्टेक होऊन तिच्याकडुन विविध कारणाने गोळीत बोलून २८ लाखाला फसवले हे कळले सुद्धा नाही.

Post a Comment

0 Comments