google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सुशीलकुमार शिंदे व मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट ; दिलदारपणे दिल्या शुभेच्छा; नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचे केलं स्वागत आणि सत्कार

Breaking News

सुशीलकुमार शिंदे व मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट ; दिलदारपणे दिल्या शुभेच्छा; नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचे केलं स्वागत आणि सत्कार

 सुशीलकुमार शिंदे व मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट ; दिलदारपणे दिल्या शुभेच्छा; नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचे केलं स्वागत आणि सत्कार

सोलापूर : काँग्रेस पक्षाच्या राजकारणात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे या दोघात पक्षांतर्गत मतभेद असल्याची चर्चा कायम ऐकण्यास मिळते. मात्र दिलदार स्वभावाचे असणारे सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाला शुभेच्छा दिल्या.

काँग्रेस पक्षाला अनेक वर्षानंतर गांधी घराणे सोडून राष्ट्रीय अध्यक्ष लाभला आहे. पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकीत कर्नाटक राज्याचे नेते खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रचंड मताधिक्याने आपले विरोधक शशी थरूर यांच्या विरोधात विजय मिळवला. मताधिक्य पाहताना स्वतः थरूर यांनी खर्गे यांना शुभेच्छा दिल्या.

 सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. आणि त्यांना शुभेच्छा दिल्या सुशीलकुमार शिंदे यांनी अतिशय दिलदारपणे खर्गे यांचे स्वागत केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Post a Comment

0 Comments