google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला परतीच्या पावसामुळे कोळेसह इतर ग्रामीण भागात पावसाचे धुमशान....

Breaking News

सांगोला परतीच्या पावसामुळे कोळेसह इतर ग्रामीण भागात पावसाचे धुमशान....

सांगोला परतीच्या पावसामुळे कोळेसह इतर ग्रामीण भागात पावसाचे धुमशान....

सांगोला कोळे / प्रतिनिधी...       कोळे व आसपासच्या परिसरातील भागात झालेल्या परतीच्या मुसळधार  पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.आज सायंकाळी पाच वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली झालेल्या दोन तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोळे व्यापारी पेठ लाईन परिसरात अक्षरशः गटारीला नाल्याचे स्वरूप आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

 गटारी तुंबून राहिल्यामुळे पावसाचे पाणी व गटारी मधील कचरा रस्त्यावर येत आहे.या ठिकाणच्या परिसरातील लोकांना याचा नाहक त्रास होत आहे व येथील लोकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. तरी स्थानिक प्रशासनाने तुंबलेल्या गटारी लवकरात- लवकर साफसफाई करून सर्वसामान्य होणारा जनतेला त्रास नाहिसा करावा असे जनतेतून बोलले जात आहे..

Post a Comment

0 Comments