google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला: तहसील कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा.

Breaking News

सांगोला: तहसील कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा.

 सांगोला: तहसील कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा.

काही कार्यालयाने मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली.

सांगोला (साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्वच कार्यालयीन प्रमुखांना आंतर राष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यासाठी आदेश पारित केला होता. सांगोला तालुक्यातील तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, वनपरिक्षेत्र कार्यालय आणि नगरपालिका येथे मोठया उत्साही वातावरणात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. प्रशासनातील कामात पारदर्शकता यावी. आणि सर्व सामान्य नागरिकांच्या मनात माहिती अधिकाराबाबत लोक जागृती व्हावी,या उद्देशाने माहिती अधिकार कायद्याने लोकांना मूलभूत अधिकार दिले आहेत.

  याच दिनाचे औचित्य साधून तहसील कार्यालयात तहसिलदार अभिजीत पाटील, नायब तहसिलदार किशोर बडवे, वसंत घुटुकडे, RTI ह्युमन ॲक्टिव्हिस्ट असोशिएशनचे सोलापूर जिल्हा प्रचार प्रमुख जगन्नाथ साठे, तालुका प्रचार प्रमुख रविंद्र कांबळे,पत्रकार संतोष साठे सर्व तलाठी आणि महसूल प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

     या वेळी तहसिलदार अभिजीत पाटील यांनी माहिती अधिकार दिनाचे महत्त्व सांगून पथ नाट्याच्या माध्यमातुन लोकजागृती करण्याचा मानस व्यक्त करून माहिती अधिकार अर्जाचा निपटारा केला असल्याची माहिती दिली.या वेळी माहिती अधिकारातून विविध प्रकारची माहिती विचारलेल्या अर्जदारांना माहिती देवून अर्जाचा निपटारा केला.या वेळी प्रचार प्रमुख जगन्नाथ साठे यांनी माहिती अधिकार कायद्याचे महत्व आणि माहिती अधिकार कायद्याचा वापर करावा, याची सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचलन नायब तहसिलदार किशोर बडवे यांनी केले तर आभार वसंत गुटूकडे यांनी मानले.

चौकट १) सांगोला सांगोला वनपरिक्षेत्र कार्यालयातही माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी बाठे साहेब यांनी माहिती अर्जाचा निपतारा आणि पेंडन्सी याबाबत माहिती दिली तर माहिती अधिकाराचे महत्त्व आणि माहिती अधिकाराबाबत लोकजागृती करण्याचा मानस माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी व्यक्त केले यावेळी वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपाल आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते 

चौकट :२)  दुय्यम निबंधक कार्यालयात ही माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला. सदर माहिती अधिकाराच्या निमित्ताने महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. माहिती अधिकाराच्या अर्जाची माहिती घेवून माहिती अधिकाराच्या अर्जाचा निपटारा प्रभारी दुय्यम निबंधक  चव्हाण साहेब यांनी केला सदर वेळी दुय्यम निबंध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments