google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 श्रीनंद हाँस्पिटल यांच्या वतीने वाणीचिंचाळे येथे लहान मुलांचे आरोग्य शिबीर संपन्न. मोफत शिबीरात तब्बल 206 बालकांची तपासणी करण्यात आली

Breaking News

श्रीनंद हाँस्पिटल यांच्या वतीने वाणीचिंचाळे येथे लहान मुलांचे आरोग्य शिबीर संपन्न. मोफत शिबीरात तब्बल 206 बालकांची तपासणी करण्यात आली

 श्रीनंद हाँस्पिटल यांच्या वतीने वाणीचिंचाळे येथे लहान मुलांचे आरोग्य शिबीर संपन्न.
मोफत शिबीरात तब्बल 206 बालकांची तपासणी करण्यात आली

सांगोला प्रतिनिधी,सांगोला येथील सुप्रसिद्ध डॉ राजेंद्र जानकर यांच्या श्रीनंद हाँस्पिटल ,ग्रामपंचायत वाणीचिंचाळे व MDMJ संघटनेच्या वतीने वाणीचिंचाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सभागृहात लहान बालकांचे शिबीर घेण्यात आले.

  या शिबीराचे उद्घाटन वाणीचिंचाळे गावाचे सरपंच प्रियंका गडहिरे, डॉ राजेंद्र जानकर, डॉ गणेश पाटील, बालरोगतज्ज्ञ, नागनाथ बनसोडे महात्मा फुले जनआरोग्य तालुका समन्वयक, शुभम वाघमारे,डॉ प्रितम बुरुंगले,लक्ष्मीकांत घोंगडे,संतोष गायकवाड घेरडी उपकेंद्र ,यांच्या हस्ते करण्यात आले.

     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबर गुरुजी यांनी केले. तर या शिबीराचे महत्त्व काय आहे हे बालरोगतज्ज्ञ डॉ राजेंद्र जानकर व नागनाथ बनसोडे यांनी सांगितले. तसेच ग्रामस्थाच्या वतीने खरात सर मुख्याध्यापक प्रगती विदयालय,व माजी सरपंच चिदानंद स्वामी यांनी आपली मते मांडली.

        यावेळी या शिबीरामध्ये मोफत तपासणी व औषध उपचार करण्यात आले. यावेळी 206 बालकांची तपासणी करण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने लहान मुलांना त्यांचे पालक या शिबिरात घेऊन आल्याने मोठी गर्दी दिसून आली.यावेळी प्रधानमंत्री जनाआरोग्य योजना व महात्मा फुले आरोग्य योजना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.याचा लाभ घेण्यासाठी आपण काय करावे हेही यामाध्यमातून सांगण्यात आले.

     यावेळी गावातील आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments