सांगोला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अशोक मुलगीर "उत्कृष्ट उपअभियंता" पुरस्काराने सन्मानित
सांगोला प्रतिनिधी,सांगोला तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे अधिकारी उपअभियंता श्री अशोक नागोराव मुलगीर यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने गौरविण्यात आले.
15 सप्टेंबर हा दिवस देशभरात अभियंता दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून आज आपण आपल्या शासकीय सेवा बजावताना केलेल्या उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन तसेच सेवा बजावत असताना आपल्या कामकाजातील तत्परता निष्ठा शिस्त तसेच सामाजिक आस्था सहकारी आणि जनता यांचे सहकार्याच्या बळावर आपण सर्वमुखी गुणी अभियंता म्हणून पात्र ठरल्याने उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कामकाज करत असताना प्रामाणिकपणे सेवा बजावून प्रत्येक कामात कार्य तत्परता दाखवून शिस्त प्रिय काम केल्याने सार्वजनिक बांधकाम मंडळ विभाग सोलापूर यांचेकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. उप अभियंता पुरस्काराने गौरविण्यात आल्याने सर्व स्तरातून मुलगीर साहेब यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


0 Comments