धक्कादायक ! NEET परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थिनींना काढायला लावले अंतर्वस्त्र…
केरळच्या शिक्षण संस्थेला काळिमा फासणारी घटना घडली. या याठिकाणी परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी कुठल्याही चुकीच्या गोष्टी करू नयेत. यासाठी अनेक उपाय योजना केल्या जातात सुरक्षितेसाठी सुपरवायझर ,सिक्युरिटी गार्ड असतात. मुलांनी कॉपी करू नयेत मुलांकडून कुठल्या चुकीच्या गोष्टी घडू नयेत यासाठी आधीच काळजी घेतली जाते. मात्र नीट परीक्षा देण्यासाठी केरळमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या त्यासोबत अत्यंत घृणास्पद असं घडल.कोल्लम या जिल्ह्यात हा प्रकार घडला. माथोर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांनी मात्र काहीही न घडल्याचा दावा केला. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास देखील केला जातोय.
काही दिवसांपूर्वी कर्नाटक मध्ये हिजाब वाद सुरू झाला होता. शाळांमध्ये मुलींनी हिजाब परिधान कर नये असे नियम देखील आले होते अशाच प्रकारे अजून अत्यंत विचित्र असा प्रकार केरळमध्ये घडला तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनींचे अंतर्वस्त्र म्हणजे ब्रा काढण्यासाठी सांगितल्या. एका खोलीमध्ये या अंतर्वस्त्र चा ढीग पाहायला मिळाला असं विद्यार्थिनी सांगतात. हे कृत्य करण्यासाठी विद्यार्थिनींना अत्यंत वाईट वाटलं कारण की तो त्यांचा वैयक्तिक गोष्ट आहे. ज्या पद्धतीने एखाद्या नियम घालून अशा पद्धतीने करणं हे चुकीचा आहे.
देशभरामध्ये रविवारच्या दिवशी नीट ची परीक्षा पार पडलेल्या लाखो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली या दरम्यान परीक्षेदरम्यान केरळमध्ये असा विचित्र प्रकार घडला. तरुणींना अंतर्वस्त्र काढायला लावण्याचा संतापजनक प्रकार घडलेल्यामुळे तरुणींचे मानसिक खच्चीकरण झाले तसेच विनयभंग झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एका पालकांनी सांगितलं कि माझ्या मुलीला सांगण्यात आलं होतं की सुरक्षेतेसाठी ब्रा काढावे लागेल अस जवळ पास 90 टक्के तरुणींनी सोबत हेच घडलं होतं त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळात खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.तस न केलास परीक्षा देता येणार नाही अस सांगितलं त्यामुळे विद्यार्थिनींना आपण जो अभ्यास केला आहे ते देखील विसरायला झालं आणि त्यामुळे पालक वर्ग मध्ये देखील मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय. यात आता पोलिस तपास काय करता हे पाहणं महत्वावाच आहे


0 Comments