google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी या चार नेत्यांच्या नावाची चर्चा ; हे नाव आले नव्याने पुढे

Breaking News

भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी या चार नेत्यांच्या नावाची चर्चा ; हे नाव आले नव्याने पुढे

 भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी या चार नेत्यांच्या नावाची चर्चा ; हे नाव आले नव्याने पुढे

सोलापूर : भारतीय जनता पक्षाने सांगोल्याच्या श्रीकांत देशमुख यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पद दिले कुणाच्या ही ध्यानी मनी नसताना मिळालेले अध्यक्ष पद देशमुखांनी चांगले सांभाळले. आक्रमक वक्तृत्वशैली असलेल्या श्रीकांत देशमुखांनी सर्वांचे लक्ष वेधले. मात्र त्यांना आपलं पद इतक्या वाईट परिस्थितीत सोडावे लागेल हे कुणाला माहीत नव्हते. 

एका महिलेसोबतचा थेट बेडरूम मधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशमुखांची मोठी बदनामी झाली. पक्षाचीही बदनामी होत असल्याने त्यांनी तातडीने राजीनामा दिला. हे पद सध्या शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे तात्पुरते स्वरूपात आहे परंतु सोलापूर जिल्हा मोठा असल्याने या पदासाठी लवकरात लवकर निवड करावी लागणार आहे. 

सध्या भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेले तात्कालीन जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, माळशिरसचे जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते पाटील, माढ्याचे शिवाजी कांबळे आणि मोहोळचे विजयराज डोंगरे यांच्या नावाची चर्चा आहे.संतोष पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद घेतल्यानंतर त्यांनी बरेच बदल केले होते. 

जिल्हाध्यक्ष पदाला त्यांनी कॉर्पोरेट लूक दिला होता पण त्याकाळातही काँग्रेसला त्यांनी बऱ्यापैकी सांभाळले होते. प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत हे त्यांचा प्लस पॉईंट मानला जातो. सध्या आक्रमक नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे अत्यंत जवळचे संतोष पाटील आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यांच्या नावाचा विचार करू शकते.

Post a Comment

0 Comments