सोलापूर जिल्ह्यात ३०८ सक्रिय रुग्ण कोरोनामुळे आणखी एकाचा बळी; 'या' तालुक्यात सर्वाधिक रुग्ण
कोरोनामुळे न्यू सुनील नगर एमआयडीसी येथील एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून सध्या ३०८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात पंढरपुरामध्ये सर्वाधिक ७९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. महापालिका क्षेत्रात २२२ कोरोना चाचण्या झाल्या. यातून ११ रुग्ण आढळून आले. सध्या शहरात ९४ सक्रिय रुग्ण आहेत. यातील ७८ जण घरात राहूनच उपचार घेत आहेत १६ जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. न्यू सुनील नगर येथील महिलेला १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मार्कंडेय सहकारी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे या महिलेचे निधन झाले.
ग्रामीण भागात एकूण २१५ कोरोना चाचण्या झाल्या. यातून ४२ रुग्ण आढळून आले. यापूर्वी रुग्णालयात दाखल असलेल्या १० जणांना डिस्चार्ज मिळाला. ग्रामीणमध्ये १८९ जण होम क्वारंटाइन आहेत. दरम्यान , ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या रविवारअखेर १ लाख ८६ हजार ५३७ झाली . यापैकी १ लाख ८२ हजार ५ ९ ४ जण बरे झाले.
मृतांची एकूण संख्या ३७२९ आहे. शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या रविवारअखेर ३४ हजार ७३ झाली. यापैकी ३२ हजार ४६९ जण बरे झाले. मृतांची एकूण संख्या १५१० झाली आषाढी वारीनंतर पंढरपरात कोराना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपुरात एका दिवसात नव्याने १७ रुग्ण आढळलेले आहेत. सध्या पंढरपुरात ७ ९ रुग्णांवर उपचार सुरू आहे . त्यापाठोपाठ माढ्यातही ५७ रुग्णांवर उपचार सुरू आहे. सततच्या पावसामुळे ग्रामीण भागात सर्दी , खोकला , ताप आदी आजाराने नागरीक त्रस्त झाले आहेत . दवाखान्यामध्ये रुग्णांची गर्दी वाढताना दिसून येत आहे.
सर्वाधिक रुग्ण पंढरपूर , माढा तालुक्यात
ग्रामीण भागात २१४ सक्रिय रुग्ण आहेत. यात अक्कलकोट तालुक्यात ५ , बार्शी ५ करमाळा ११ , माढा ५७ , माळशिरस १४ , मंगळवेढा ८ , मोहोळ १४ उत्तर सोलापूर ७ , पंढरपूर ७९ , सांगोला ९ आणि दक्षिण सोलापूर ५ .


0 Comments