google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विरोधी पक्षनेते अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ; हे आहे कारण

Breaking News

विरोधी पक्षनेते अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ; हे आहे कारण

 विरोधी पक्षनेते अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ; हे आहे कारण 

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या विकास कामांना स्थगिती देण्याचा घाट मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातला आहे. याच पार्श्वभूमीवर विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या नेतृत्वाखालीराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, दत्तात्रय भरणे यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

यावेळी राज्यातील विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी केली. तसेच याच शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत द्यावी अशी मागणी केली.

Post a Comment

0 Comments