google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चालकाची दगडाने ठेचून हत्या; हत्येनंतर जाळला चेहरा!

Breaking News

चालकाची दगडाने ठेचून हत्या; हत्येनंतर जाळला चेहरा!

 चालकाची दगडाने ठेचून हत्या; हत्येनंतर जाळला चेहरा!

संख : जाडरबोबलाद (ता. जत) येथे एका चालकाची  दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. श्रीशैल निलाप्पा सायगाव (वय ४७) असे त्याचे नाव आहे. आज, सोमवारी सकाळी ही घटना घडल्याचे समोर आले. खून करुन त्याचा मृतदेह जाडरबोबलाद-मारोळ रस्त्यावरील ओढापात्रात टाकला आहे. मारेकऱ्याने त्याचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी कि,  जाडरबोबलाद येथील श्रीशैल सायगाव हा खासगी गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. त्याला दारुचे व्यसन होते. त्याच्या या व्यसनामुळे पत्नी, मुले बाहेर गावी वेगळे रहात आहेत. गावात तो एकटाच रहात होता. दररोज कुठे मिळेल त्या गाडीवर चालक म्हणून तो काम करीत होते. रविवारी रात्री गावात साडेसात वाजेपर्यंत होते. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह जाडरबोबलाद-मारोळ रस्त्यावरील ओढापात्रात आढळून आला. त्याच्या भावाने मृतदेह ओळखला. दरम्यान,  त्याचा चेहरा, मानेवरील चमडे काढलेले, जळाले होते. त्याचा दगडाने ठेचून खून केला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, या खूनाबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments