google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना थेट धक्का; नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करत स्वतःचीच मुख्यानेते पदी निवड

Breaking News

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना थेट धक्का; नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करत स्वतःचीच मुख्यानेते पदी निवड

 एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना थेट धक्का; नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करत स्वतःचीच मुख्यानेते पदी निवड

मुंबई : एकनाथ शिंदे  यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यांच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस  सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेनेला एकपाठोपाठ एक धक्के मिळत आहेत. शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. महाराष्ट्रातील आमदारांबरोबर आता शिवसेनेचे तब्बल 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरेंकडे फक्त 6 खासदार उरले आहेत.

शिंदे गटात सामील झालेले खासदार खालीलप्रमाणे

हेमंत गोडसे – नाशिक, राजेंद्र गावित – पालघर, धैर्यशील माने – हातकणंगले, संजय मंडलिक – कोल्हापूर, सदाशीव लोखंडे – शिर्डी, भावना गवळी- यवतमाळ-वाशिम, राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य, श्रीरंग बारणे – मावळ, संजय जाधव – परभणी, प्रतापराव जाधव – बुलढाणा, कृपाल तुमाने – रामटेक, हेमंत पाटील – हिंगोली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे 18 खासदार राज्यात निवडून आले होते. त्यावेळी एनडीएत असलेल्या शिवसेनेने भाजपासोबत एकत्र निवडणूक लढवली होती. आता शिवसनेचे तब्बल 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. तर द्धव ठाकरेंकडे फक्त 6 खासदार उरले आहेत. त्यामध्ये श्रीकांत शिंदे – कल्याण, राजन विचारे – ठाणे,गजानन किर्तिकर – मुंबई उत्तर पश्चिम,अरविंद सावंत – मुंबई मध्य,ओमराजे निंबाळकर – उस्मानाबाद,विनायक राऊत – रत्नागिरी यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी आमदारांपाठोपाठ नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मीरा भाईंदर येथील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात  प्रवेश केला आहे. यानंतर आता शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

ट्रायडंट हॉटेल मध्ये बैठक पडली पार

या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे  यांची मुख्यनेतेपदी नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांनी पक्षप्रमुख पदाला हात लावला नाही.आजच्या बैठकीत एकनाथ शिंदे  यांनी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारीनीही जाहीर केली. त्यामध्ये रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव आडसूळ यांची नेते पदी नियुक्ती केली. तर आमदार दीपक केसरकर यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड केली आहे. तर उपनेतेपदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड केली आहे. त्यामुळे शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. यावेळी जुनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे 14 खासदार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments