google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 15 वर्षीय मुलीवर स्कूल बस चालकाने केला लैंगिक बलात्कार!

Breaking News

15 वर्षीय मुलीवर स्कूल बस चालकाने केला लैंगिक बलात्कार!

 15 वर्षीय मुलीवर स्कूल बस चालकाने केला लैंगिक बलात्कार!

पुणे : पुण्यातील वडाची वाडी परिसरात राहणार्‍या 15 वर्षीय मुलीवर बस चालकाने बलात्कार केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर घुले पाटील वय 35 रा.वडाची वाडी असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,  आरोपी सोमेश्वर घुले पाटील याची स्कूल बस आहे. आरोपीच्या बसमधून ती पीडित मुलगी शाळेसाठी नेहमी जाते. त्यामुळे आरोपी आणि पीडित मुलीची ओळख झाली. त्या ओळखीमधून आरोपी पीडित मुलीस म्हणाला की, आपण रिलेशनशिपमध्ये राहूया. 

परंतु, नेमके रिलेशनशिप काय प्रकार असतो, हे पीडित मुलीस माहिती नव्हते. त्याचा गैरफायदा घेऊन आरोपी सोमेश्वर घुले पाटील याने तिच्यावर मार्च आणि जून दरम्यान अनेक ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, याबाबत पीडित मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments