अरे व्वा ! सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व अंगणवाडीत नळ कनेक्शन ; सीईओ स्वामींनी का दिल्या तपासणी करण्याच्या सूचना
सोलापूर : जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल या योजनेची आढावा बैठक सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली शिवरत्न सभागृहात पार पडली.
बैठकीला मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता दीपक कोळी, प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांच्यासह सर्व तालुक्यातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता यांची उपस्थिती होती. दरम्यान बैठकीत सीईओ स्वामी यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची सर्व कामे येत्या 30 जुलै पर्यंत पूर्ण झाली पाहिजेत अशी सक्त ताकीद उपस्थित अभियंत्यांना दिली.
हर घर नल से जल या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाडीला नळ जोडणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या कामाबद्दल पाणी पुरवठा विभागाचे अभिनंदन करण्यात आले मात्र खरेच नळ जोडणी झालीय का?त्यासाठी तपासणी करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभाग व महिला बालकल्याण विभागाच्या यंत्रणेला स्वामी यांनी दिल्याचे सांगितले.


0 Comments