google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूरात उडाली खळबळ; वारकऱ्यांना झाली विषबाधा.

Breaking News

पंढरपूरात उडाली खळबळ; वारकऱ्यांना झाली विषबाधा.

 पंढरपूरात उडाली खळबळ; वारकऱ्यांना झाली विषबाधा.

बासूंदी खाल्ल्याने झाली विषबाधा अन्न व भेसळ प्रशासनाचा "भोंगळ" कारभार चव्हाट्यावर

पंढरपूर प्रतिनिधी,पंढरपूर येथे आलेल्या वारकऱ्यांना मठात जेवन केल्यानंतर बासूंदीतून विषबाधा झाली असल्याचे समजते आहे.यामध्ये सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ अरविंद गिराम यांनी सांगितले आहे परंतु या निमित्ताने का होईना मात्र अन्न व भेसळ विभागाचा गलथान आणि भोगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

पंढरपूर येथील 65 एकर समोर असलेल्या श्री विठ्ठल आश्रम येथे जेवणातून चाळीस लोकांना विषबाधा झालेली आहे. हे सर्व रुग्ण उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे ॲडमिट आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सचिन वाळुंजक, (फिजिशिय()यांनी रुग्णांची तपासणी केलेली असून सर्व रुग्ण त्यांच्या निगरानी खाली आहेत यापैकी कोणीही अत्यवस्थ नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रुग्णावर पुढील उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अध्यक्ष डॉ. अरविंद गिराम यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments