बायको जवळ घेत नाही , म्हणून नवऱ्याने केले ' हे ' भयंकर कृत्य !
मुंबई : मुंबईत पतीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे . बायको जवळ घेत नसल्याचा राग अनावर झाल्याने ५८ वर्षीय व्यक्तीने ४८ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे . याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे . याबद्दल अधिक माहिती अशी कि , ज्ञानोबा बलाडे हा मालवणीच्या यशोदिप को आप सोसायटी , अंदा कॉलनी गेट नं ८ येथे राहण्यास आहे .
सदर ठिकाणी त्याच्या पत्नीसोबत राहतो . शुक्रवारी रात्री ज्ञानोबा बलाडे हा पत्नीच्या शेजारी झोपायला गेला . मात्र , पत्नीने त्यास जवळ झोपू दिले नाही . या गोष्टीचा राग अनावर झाल्याने ज्ञानोबा बलाडे याने दगडाचा पाटा पत्नीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली .दरम्यान ,. पोलिसांना घटनेची माहिती कळताच घटनास्थळी दाखल झाले . त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी ज्ञानोबा बलाडे याला पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक केली .


0 Comments