अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन, सरकारची मोठी घोषणा…!!
केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकार लवकरच या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दुसरीकडे सरकारने या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची (Promotion) प्रक्रियाही सुरू केल्याचे समजते.. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात डबल वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. केंद्र सरकारने 1 जुलै 2022 रोजी तीन केंद्रीय सचिवालय संवर्गातील 8000 हून अधिक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर लवकरच उर्वरित सरकारी अधिकाऱ्यांनाही ‘प्रमोशन’ दिलं जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलीय..
केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासन
केंद्रीय सचिवालय राजभाषा सेवा ग्रुप-‘अ’मधील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. 26) केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. त्यात अधिकाऱ्यांनी प्रलंबित प्रमोशनबाबतची माहिती दिली.. त्यावर शिष्टमंडळाच्या मागण्यांचा विचार करु, तसेच प्रमोशन बाबतच्या अडचणींवर तोडगा काढण्याचे आश्वासन मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिले..
ते म्हणाले, की कोणत्याही पदोन्नतीशिवाय सेवानिवृत्त होणं, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निराशाजनक आहे.. आतापर्यंत 8089 कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील सर्व कायदेशीर अडथळे दूर झाले असून, भविष्यात सर्व अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली जाईल..” या संपूर्ण प्रकरणात वैयक्तिकरित्या लक्ष दिल्याबद्दल मंत्री जितेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानले. दरम्यान, याबाबत ‘पीआयबी’ कडून ट्विट करुन माहिती देण्यात आली आहे.. त्यामुळे मोदी सरकार लवकरच पुढील स्लॉटमध्ये ग्रुप-‘अ’मधील अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्याची शक्यता आहे.. येत्या दोन-तीन आठवड्यात पदोन्नतीबाबत मोठी घोषणा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली..
केंद्रीय सचिवालय सेवा ही प्रशासकीय नागरी सेवांपैकी एक आहे. ज्यामध्ये ग्रुप ‘अ’ आणि ग्रुप ‘ब’ पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.. या कर्मचाऱ्यांना आता प्रमाेशन मिळणार असल्याचे संकेत मोदी सरकारने दिले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे..


0 Comments