सांगोल्यातील १८ वर्ग खोल्या धोकादायक ४३ शाळांना लागली गळती ; विद्यार्थ्यांना घ्यावा लागतोय इतरत्र आडोसा
सांगोला : सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १८ शाळांच्या १८ खोल्या धोकादायक बनल्या आहेत , तर ४३ शाळांच्या खोल्या पावसामध्ये गळत आहेत . ६५ शाळांची किरकोळ दुरुस्ती असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे . ऐन पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत असून एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण , असा प्रश्न उपस्थित होत आहे . शाळांच्या खोल्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करणे आवश्यक होते , मात्र जिल्हा शिक्षण विभागाच्या डोळेझाकपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे .
सांगोला तालुक्यात ३८ ९ जिल्हा परिषद शाळा आहेत . यामधील ३० ते ३५ टक्के शाळांच्याखोल्या नादुरुस्त , धोकादायक , किरकोळ दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत . धोकादायक खोल्या असलेल्या शाळांमधील अनेक खोल्यांना तडे जाणे , छत गळणे , छातातून पावसाचे पाणी येणे यासारखी स्थिती आहे . या परिस्थितीमुळे शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे .
दरम्यान , जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणपध्दती सुरू केली असताना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुसज्ज खोल्या असणे आवश्यक आहे , मात्र झेडपीच्या काही शाळांमध्ये धोकादायक स्थितीत शिक्षण सुरू आहे . याबाबत सांगोला तालुका शिक्षण विभागाकडून नादुरुस्त खोल्यांची माहिती मागविण्यात आली होती .त्यानुसार शाळांच्या शिक्षकांनी शाळांच्या स्थितीबाबत शिक्षण विभागाला माहितीही दिली आहे . ही माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात आली आहे ,
परंतु शिक्षण विभागाच्या अधिकान्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते . वरिष्ठांकडून त्याला मंजुरी मिळालेली नाही . इमारतीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच वाईट होत आहे . शाळेच्या इमारतीचे बांधकाम कालबाह्य झाल्याने दुरवस्था झाली आहे . शिक्षण क्षेत्रात देखील मोठमोठ्या स्पर्धा निर्माण झाल्याने जिल्हा परिषद शाळांमध्येदेखील त्याच पद्धतीने तोडीस तोड शिक्षणपद्धती उपलब्ध करून दिली आहेत . डिजिटल आणि अत्याधुनिक युगात विद्यार्थी सर्वांगीण बाजूने घडले पाहिजे , याकरिता जिल्हा परिषदेचे शिक्षकप्रयत्नशील आहे . तालुक्यात लोकसभाच्या माध्यमातून बहुतांश शाळा डिजिटल आणि आयएसओ मानांकनप्राप्त झाल्या आहेत .
एकीकडे अशी परिस्थिती असली तरी दुसरीकडे मात्र तालुक्यातील धोकादायक शाळांची परिस्थितीदेखील विद्यार्थ्यांना धोक्याची घंटा देताना दिसून येत आहे . यासंदर्भात शिक्षकांनी पंचायत • समिती शिक्षण विभागाकडे या संदर्भात अहवाल सादर केला आहे . हा अहवाल शिक्षण विभागाकडून वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे . यावर सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तत्काळ उपाययोजना करून ना दुरुस्त व धोकादायक शाळा दुरुस्ती करून घ्याव्यात , अशी मागणी पालकवर्गातून जोर धरू लागली आहे .


0 Comments