दहा हजार मागून चार हजाराची लाच घेताना खाजगी इसम अँटीकरप्शनच्या जाळ्यात
सोलापूर : बालगृहातील मुलीची भेट घालून देण्यासाठी 10 हजाराची लाच मागणी करून त्यातील 5 हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शिवराज संतोष करळे, वय ३१ वर्षे, राहणार गाईड हॉस्पिटल, अवंती नगर,सोलापूर या खाजगी इसमाला लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार यांच्या चुलत बहीणीच्या मुलीस (चुलत भाची) बालगृह सोलापूर येथे ठेवण्यात आले असून यातील खाजगी इसम करळे यांनी यापुर्वी बरीच वर्षे बालगृह सोलापुर येथे काम केले असल्याचे सांगून सदर बालगृहातील अधिकारी कर्मचारी हे त्यांच्या ओळखीचे असल्याचे भासवून या ओळखीचा वापर करुन तक्रारदार यांना त्यांच्या चुलत भाचीची भेट घालून देण्याकरीता खाजगी इसम शिवराज संतोष करळे यांनी तक्रारदार यांचेकडे १०,००० रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी १,००० रुपये यापूर्वी दि. २८/०७/२०२२ रोजी पहीला हप्ता म्हणून फोन पे द्वारे स्विकारले आहे.
दुसरा हप्ता ४००० रुपये रोख स्वरूपात आज दि. २९/०७/२०२२ रोजी स्वतः स्वीकारून वैयक्तीक सांपत्तीक फायदा मिळवण्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले आहे. यातील खाजगी इसम करळे यांना लाच मागणी करून स्विकारलेवरून दि. २९/०७/२०२२ रोजी रंगेहाथ पकडण्यात आलेले असून त्यांना चौकशीकामी जाच्यात घेण्यात आले आहे, तरी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.


0 Comments