google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चक्क! 980 ग्रॅम वजनाच्या मुतखड्याची शस्त्रक्रिया यशस्वी; भारतातील सर्वात मोठा मुतखडा म्हणून मान्यता!

Breaking News

चक्क! 980 ग्रॅम वजनाच्या मुतखड्याची शस्त्रक्रिया यशस्वी; भारतातील सर्वात मोठा मुतखडा म्हणून मान्यता!

चक्क ! 980 ग्रॅम वजनाच्या मुतखड्याची शस्त्रक्रिया यशस्वी; भारतातील सर्वात मोठा मुतखडा म्हणून मान्यता!

धुळे : धुळ्यात एका पन्नास वर्षीय शेतकऱ्याच्या पोटातून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून 980 ग्रॅम वजनाचा व जवळपास 12 सेंटीमीटर पेक्षाही मोठ्या आकाराचा मुतखडा यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्यात डॉ. आशिष पाटील यांना व त्यांच्या टीमला यश आले आहे. इंडिया बुक व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या सर्वात मोठ्या मुतखड्याची नोंद देखील करण्यात आली आहे. 


प्राप्त माहितीनुसार, रमण चौरे या नंदुरबार येथील पन्नास वर्षीय शेतकऱ्याला गेल्या काही दिवसांपासून लघवीचा मोठ्या प्रमाणात त्रास सुरू होता, यावर त्यांनी बहुतांश ठिकाणी उपचार देखील घेतले. परंतु कुठल्याही प्रकारे आराम वाटत नसल्याने अखेर रमण चौरे यांनी धुळ्यातील डॉक्टर आशिष पाटील यांच्याशी संपर्क केला, त्यानंतर डॉक्टर आशिष पाटील यांनी मुतखड्याशी संबंधित सर्व चाचण्या करून घेतल्या, त्यात त्यांना रमण चौरे यांच्या पोटात मोठ्या आकाराचा मुतखडा असल्याचे लक्षात आले, डॉक्टर आशिष पाटील व त्यांच्या टीमला हा मुतखडा बाहेर काढण्यात यश आले आहे.


दरम्यान,  आता या मुतखड्याची दखल इंडिया बुक व एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे, आणि भारतातील सर्वात मोठा मुतखडा म्हणून मान्यता देखील देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments