google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक : ” यामुळे ” तिला विकावे लागले तिच्या पोटचे ७ मुल.

Breaking News

धक्कादायक : ” यामुळे ” तिला विकावे लागले तिच्या पोटचे ७ मुल.

 धक्कादायक : ” यामुळे ” तिला विकावे लागले तिच्या पोटचे ७ मुल. 

अशीच एक बातमी समोर येत आहे. आई व मुलांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी घडली आहे. कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने बऱ्याच लोकांचे जीवन बदलले गेले. असंच काहीसं या ठिकाणच्या महिलेसोबत घडलं आहे. कोरोनामध्ये तिचे पती जग सोडून गेले. घरात उपजीविकेचे साधन नव्हते म्हणून तिने चक्क तिच्या पोटच्या एक नाही, दोन नाही, तर सात मुलांना विकून टाकण्याचा बेत आखला. मात्र हे करत असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.


पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे त्या मुलांची बालसुधारगृहांमध्ये रवानगी करण्यात आली आहे. या महिलेचे नाव हिराबाई गायकवाड वय ४० राहणार बेगर फिरस्ते असे आहे. अमळनेर शहरातील गांधीपुरा भागातील सुभाष चौकामध्ये एक महिला मुलांची विक्री करणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अधिक तपासासाठी पोलीसानी महिलेचा शोध घेण्यासाठी एका पथकाला पाठवले. सदरील पदकाने या महिलेला चौकशी केली असता ती भांबवलेल्या अवस्थेत दिसून आली.


त्या ठिकाणी तिच्यासोबत तीन मुली व चार मुले होते. त्या सगळ्यांना पोलीस ठाण्याला आणण्यात आले. पोलीस ठाण्याला आणल्यानंतर त्या मुलांबाबत चौकशी केली असता सोबतची मुले हे तिची स्वतःची अपत्ये असून तिचा पतीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आणि उपजीविकेचे कुठलेही साधन शिल्लक नसल्याने ती पोटच्या मुलांची जे इच्छुक लोक आहेत, त्यांना विक्री करत होती मुलांना विकणे हे बेकायदेशीर आहे असं त्या महिलेला सांगून समज देण्यात आला.


सदरील महिला भविष्यात या मुलांना विकून टाकणार नाही ना, म्हणून तीन मुली व चार मुलांना संरक्षण व पालन पोशनासाठी बालकल्याण समिती जळगाव येथे हजर करून त्या मुलांना बाल सुधार गृहात पाठवण्यात आले.

Post a Comment

0 Comments