सॉरी मम्मी-पप्पा’ म्हणत त्याने इमारतीवरून उडी घेतली
नागपूर – बारावीत नापास झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या विद्यार्थ्याने इमारतीच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना शनिवारी उघडकीस आली. हिमांशू धनराज कलंत्री (१८,गणेशपेठ) असे मृत मुलाचे नाव आह. धनराज कलंत्री हे व्यवसायिक आहेत. पत्नी, मुलगा हिमांशू आणि मुलीसह श्रद्धा मंगलम अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या माळ्यावर राहतात.
हिमांशू जैन इंटरनँशनल शाळेचा बारावीचा विद्यार्थी होता. तर त्याची बहिणी सनदी लेखापाल (सीए) शिक्षण घेत आहे. सीबीएससी बारावीचा शुक्रवारी निकाल लागला. हिमांशू नापास झाल्याने नैराश्यात गेला. शनिवारी सकाळी उठला. चहा घेतला आणि नऊ माळ्याच्या इमारतीच्या छतावर गेला. त्याने मोठ्याने ‘सॉरी मम्मी-पप्पा’ असे ओरडून खाली उडी घेतली. इमारतीतील नागरिक जमा झाले. हिमांशूूचा जागीच मृत्यू झाला होता.
बहिणीचा वाढदिवस रद्द
हिमांशूची बहिण सनदी लेखापाल पदवी घेत आहे. शुक्रवारी २२ जुलैला तिचा वाढदिवस होता. त्यामुळे तिची सकाळपासूनच वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी सुरू होती. घरात आनंदी वातावरण होते. हिमांशूचाही निकाल लागला की दुहेरी आनंद साजरा करीत केक कापून रात्री बाहेर जायचे ठरले होते. परंतु, हिमांशूचा निकाल लागल्यानंतर बहिणीचा वाढदिवस रद्द करण्यात आला. त्यामुळे हिमांशूच्या मनावर परिणाम झाला.
बहन… तेरी शादी में मैं नही रहुंगा..पर उपर से तेरी शादी देखुंगा और मैं बहोत एंजॉय करूंगा’ अशा प्रकारचा उल्लेख हिमांशूने आपल्या हिमांशूने आपल्या बहिणीसाठी केला. ‘आई-बाबा, मला माफ करा. माझ्या मृत्यूसाठी मीच जबाबदार आहे. मला अपयश पचविता आले नाही. मी यशस्वी होऊ शकत नव्हतो, म्हणून मी आत्महत्या करीत आहे.’ असा उल्लेख त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला आहे.


0 Comments