google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 १७ वर्षीय युवतीवर ४७ वर्षीय नराधमाने केला अत्याचार!

Breaking News

१७ वर्षीय युवतीवर ४७ वर्षीय नराधमाने केला अत्याचार!

१७ वर्षीय युवतीवर ४७ वर्षीय नराधमाने केला अत्याचार!

यवतमाळ : तालुक्यातील एका गावातील गतीमंद व अल्पवयीन असलेल्या एका १७ वर्षीय युवतीवर ४७ वर्षीय नराधमाने अत्याचार केला. याप्रकरणी शनिवारी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरेश पोचीराम गडेवार असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून तो शहरातील दामले फैलातील रहिवासी आहे.


याबद्दल अधिक माहिती अशी कि, २२ जुलै रोजी शुक्रवारी पीडित गतिमंद युवती ही आपल्या घरी होती. यादरम्यान, सुरेशने पोळा सणाच्या निमित्ताने जिवती लावण्याच्या कारणावरून घरात प्रवेश केला. यावेळी त्याने पीडितेच्या एकटेपणाचा फायदा घेत, तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर नराधमाने तेथून पलायन केले.  सायंकाळी पीडित मुलीचे आईवडिल घरी आल्यानंतर तिने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली.


दरम्यान,  कुटुंबियांनी लगेच वणी पोलीस ठाणे गाठून अत्याचार झाल्याबाबत तक्रार दाखल केली. त्यावरून वणी पोलिसांनी आरोपी सुरेश पाेचीराम गडेवार याच्याविरूद्ध भादंवि कलम ३७६, बाल लैंगीक शोषण अधिनियम पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.


Post a Comment

0 Comments