एक वर्षाचा मुलगा आणि मुलीसह महिलेनं तलावात उडी मारून संपवलं आयुष्य..
बुलडाणा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या दोन मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा नदीच्या कर्डी तलावात घडली आहे. स्वतः तर जीव दिलाच मात्र सोबत दोन मुलांनाही मृत्यूच्या दारात ढकल असल्याने या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, .सरिता पैठणे असं मृत महिलेचं नाव आहे. तर11 वर्षाची वेदीका आणि 1 वर्षांचा वंश पैठणे असं मृत मुलांची नाव आहे. सरिता पैठणेने दोन्ही मुलांसोबत तलावात उडी टाकली. महिलेचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अजून महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला असला तरी मात्र तिच्यासोबतच्या दोन चिमुकल्यांचा अजूनही ठावठिकाणा लागू शकलेला नाही. सध्या चिमुरड्यांचा शोध सुरू आहे.पतीचा त्रासाला कंटाळून सदर विवाहितेने आत्महत्या केली असल्याचे कारण समोर येत असून पतीच्या संशयी वृत्तीमुळे आणि मारहाणीमुळे महिलेनं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तालुक्यातील करडी येथील तलावात नागरिकांना महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्यावर याबाबतची माहिती बुलडाणा पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि महिलेचा मृतदेह काढून पंचनामा करण्यात आला. दरम्यान, सरिताचा मृतदेह हाती लागला आहे. पण तिच्या दोघा मुलांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


0 Comments