स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी
कुर्डुवाडी पोलीस ठाणे येथे गुरनं २७२ / २०२१ भादंवि क. ३९४, ३४ वगैरे प्रमाणे दिनांक २५/०६/२०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयाचे तक्रारदार हे विविध कंपनीच्या बॅटरीज त्यांच्या वाहनातून घेवुन त्या पोहोच करण्याकरीता तासगांव येथुन केज जि. बीड येथे निघाले होते. दिनांक २५/०६/२०२१ रोजी ०३/०० ते ३०/२० वा. च्या दरम्यान एका अज्ञात सुमो चालकाने त्यांचे गाडीला आडवुन तक्रारदार चालकास हाताने व काटीने मारहाण करून त्याचे जवळील ९८,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल जबरी चोरी करून नेला म्हणुन गुन्हादाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाची तीव्रता पाहता मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती तेजस्वी सातपुते (भापोसे), सोलापूर ग्रामीण यांनी गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून त्यांचा शोध घेणेबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांना सुचना दिल्या होत्या. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे व त्यांचे पथकास घटनास्थळास भेट देवुन आरोपींचा शोध घेणे बाबत आदेशीत केले.
स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे व त्यांचे पथकाने घटनास्थळास भेट देवुन आजुबाजुच्यापरिसातुन आरोपीचा शोध घेण्याच्या दृष्टीने माहिती घेण्यास सुरूवात केली. अशा प्रकारचे गुन्हे करणारे रेकॉर्ड वरीलआरोपी यांचा शोध घेण्यास सुरुवात केली तसेच गुन्हयाचा घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषन करून आरोपीचा शोधघेण्याचा प्रयत्न करण्यात येते होता.
आरोपीत यांनी वापरलेली गाडी निष्पण करून त्याव्दारे देखील आरोपींचा शोधघेण्यात येत होता..नमुद घटनास्थळाचे विश्लेषण व गुप्त बातमीदार याने दिलेल्या बातमी प्रमाणे सदरचा गुन्हा उस्मानाबाद जिल्हयातील आरोपीतांनी केल्याची माहिती मिळाली. सदर आरोपींचे ठाव ठिकाणा प्राप्त करता ते नवी मुंबई वाशी येथे असल्याचे समजले.
सहा. पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे यांनी सदर आरोपींची माहिती वरीष्ठ अधिकारी यांना देवुन सदर पथक नवी मुंबई येथे रवाना झाले. नमुद आरोपी हे नवी मुंबई, पनवेल, लोणावळा, पुणे मार्गे सोलापूर जिल्हयातुन उस्मानाबादकडे निघाले होते. सदर पथकाने त्यांचा अत्यंत कौशल्याने पाठलाग करून आरोपींना कोणत्याही प्रकारची चाहुल लागु न देता बार्शी तालुका येथील मौजे कारी येथे एकुण ४ आरोपी ताब्यात घेतले.
त्यांचेकडे केले तपासात नमुद आरोपीतांनी लातुर येथील अन्य २ आरोपी समवेत सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयास भादंवि क. ३९५ हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. एकुण ६ आरोपीतांना तपासकामी कुर्डुवाडी पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असुन, पुढील तपास पोसई हनुमंत वाघमारे कुर्डुवाडी पोलीस ठाणे हे करीत आहेत. नमुद आरोपी यांचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेला ७१,०००/- रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
नमुद आरोपी यांचेकडे केले तपासात आरोपीत हे मध्य रात्रीचे वेळेला महामार्गावरीलरस्त्याच्याकडेला लोखंडी जॅक टाकुन दबा धरून बसतात. वाहन चालक लोखंडी जॅक बघण्यासाठी खाली उतरल्यानंतर दबा धरून बसलेले आरोपी हे चालकास मारहाण करून त्याच्या जवळील माल बळजबरीने हिसकावुन घेतात. अशा स्वरूपाचेगुन्हे आरोपीतांनी लातुर, बीड, उस्मानाबाद, जालना, जळगांव तसेच मध्यप्रदेश राज्यातील बु-हाणपुर, हातरस येथे केले असल्याचे सांगितले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती. तेजस्वी सातपुते (भापोसे), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, यांचे पथकातील सहा. पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड, पोहेकॉ / आबासाहेब मुंढे, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, सलीम बागवान पोना / रवि माने, मपोना / अनिसा शेख, पोना/ व्यंकटेश मोरे सायबर सेल यांनी बजावली आहे.


0 Comments