आर पी आय ( आठवले गट) सोलापूर जिल्हा व तालुका कार्यकारणी निवडीसाठी अकलूज येथे बैठकीचे आयोजन
सांगोला / सोलापूर जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाची जिल्हा कार्यकारणी ( पदाधिकारी ) व सर्व तालुका अध्यक्ष यांची निवड करण्यासाठी अकलूज येथील अन्नपूर्णा सभागृह येथे मंगळवार दि. 26 जुलै रोजी दुपारी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस सुरजदादा बनसोडे यांनी दिली आहे
या बैठकीस राज्य संघटक सुनीलजी सर्वगोड, पश्चिम महाराष्ट्र संघटक दयानंद धाइंजे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष अजित गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अमर माने, पश्चिम महाराष्ट्र नेते जयवंत पोळ, जिल्हा सहसचिव प्रदीप धाईंजे, राज्य उपाध्यक्ष नंदकुमार केंगार, युवक राज्य उपाध्यक्ष कीर्तीपाल सर्वगोड, पश्चिम महाराष्ट्र सचिव नागनाथ ओहोळ, जिल्हा सरचिटणीस सुरजदादा बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण अण्णा बनसोडे , जिल्हा उपाध्यक्ष उत्तम गायकवाड, ज्ञानदेव कांबळे-पाटील, युवक पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजाभाऊ भोसले, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष बापूसाहेब जगताप, युवक राज्य सचिव दीपक चंदनशिवे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष अशोक सरवदे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष युवराज वाघमारे,जिल्हा उपाध्यक्ष शामराव भोसले, जिल्हा संपर्क प्रमुख भारत आठवले, जिल्हा अध्यक्ष सोशल मीडिया रविराज बनसोडे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आर पी आय जिल्हा सरचिटणीस सुरजदादा बनसोडे यांनी केले आहे.


0 Comments