google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्ह्यातील आरपीआयचे दोन्ही गट एकत्रीकरण करण्याचा रामदास आठवले यांचा आदेश

Breaking News

सोलापूर जिल्ह्यातील आरपीआयचे दोन्ही गट एकत्रीकरण करण्याचा रामदास आठवले यांचा आदेश

 सोलापूर जिल्ह्यातील आरपीआयचे दोन्ही गट एकत्रीकरण करण्याचा रामदास आठवले यांचा आदेश..

बी टी शिवशरण संपादक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाला स्वतंत्र निवडणूक चिन्ह  निवडणूक आयोगाने देण्यासाठी  पक्षाची सभासद नोंदणी कार्यकारिणी निवड ही  बांधणी कायदेशीररीत्या व नियम अटी घालून  संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाचे काम सुरू झाले आहे त्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही गट एकत्रीत करुन एकसंध पक्ष ठेवण्याचे आदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना रामदास आठवले साहेब यांनी दिले आहेत.


  त्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील आरपीआयचे दोन्ही गट एकत्रीत आणण्याची हालचाली गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झाल्या आहेत राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी पुढाकार घेऊन  जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते नेते यांच्या बरोबर चर्चा संवाद साधला आहे  दोन्ही गट एक झाले तर पक्षाची ताकद वाढणार आहे  आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक  यामध्ये निश्चितच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडणुकीत यश संपादन करतील .


 याबाबत काही ज्येष्ठ नेते कार्यकर्ते यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता दोन्ही गट एकत्रीत आले पाहिजेत  आठवले साहेब यांचा आदेश प्रमाण मानला जावा असे बहुतांश कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे माळशिरस तालुक्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी सोलापूर जिल्हा अध्यक्ष त्यांचे गटाचा निवडला आहे .


मग आमचे गटाला जिल्हा युवक अध्यक्ष  पद द्यावे याबाबत वरिष्ठ पातळीवर जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते निर्णय घेतील  सर्वसामान्य कार्यकर्ते स्थानिक पातळीवर शाखा अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी यांची प्रामाणिक इच्छा आहे कार्यकर्त्यांचे ऐक्य झाले पाहिजे पक्षाची ताकद वाढली पाहिजे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की एकीत जय बेकीत क्षय   आतापर्यंतच्या फुटीरवादी इतिहासाची पाने फाडून ऐक्याचा  ग्रंथ निर्माण केला जावा  काल परवा


 राजकारणात आलेले पक्ष गट नेते हे सत्तेत राहू शकतात मग गेली साठ वर्षे रिपब्लिकन पक्षाची ताकद असतांना केवळ गटा तटात नेतृत्व वादात अडकल्याने आपल्या मतांवर दुसरेच निवडुन  जातात सत्तेत बसतात   त्यामुळे आता हा शिक्का ही ओळख पुसून टाकायची असेल तर दलित समाज कार्यकर्ते नेते एक झाल्याशिवाय पर्याय नाही 

जिल्ह्यातील काही बाजारबुणगे यांना ऐक्य नको आहे कारण दोन्ही गट एक झाले तर त्यांचे दुकानं बंद पडेल ही भिती त्यांना सतावते आहे अशा मतलबी स्वार्थी  दलबदलू व दुसरे पक्षाच्या वळचणीला  राहून आपली पोळी भाजून घेण्यासाठी  पक्ष दावणीला बांधणारांना समाजच धडा शिकविण्यासाठी  पुढे येईल

Post a Comment

0 Comments