google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यात पुन्हा मास्क सक्ती..? टास्क फोर्सकडून राज्य सरकारला महत्वाच्या शिफारशी..!

Breaking News

राज्यात पुन्हा मास्क सक्ती..? टास्क फोर्सकडून राज्य सरकारला महत्वाच्या शिफारशी..!

 राज्यात पुन्हा मास्क सक्ती..? टास्क फोर्सकडून राज्य सरकारला महत्वाच्या शिफारशी..!

राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषत: मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा वेग चिंताजनक आहे.. त्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. 6) रात्री उशीरा टास्क फोर्सची बैठक झाली.. त्यात टास्क फोर्सने सरकारला महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत..

कोरोना संसर्ग कमी झाल्याने ठाकरे सरकारने मास्क सक्तीचा निर्णय मागे घेतला होता. मात्र, त्यानंतरही सरकारकडून नागरिकांना मास्क वापराबाबत सातत्याने आवाहन केलं जात होतं.. आता ‘टास्क फोर्स’नेही सार्वजनिक ठिकाणांसह गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची शिफारस सरकारला केली आहे. अर्थात, त्यात मास्क सक्तीबाबत म्हटलेलं नाही.

टास्क फोर्सच्या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर चर्चा झाली. टास्क फोर्सने राज्य सरकारला महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकार लवकरच या शिफारशी राज्यात लागू करण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

टास्क फोर्सच्या शिफारशी
– सार्वजनिक ठिकाणे, रुग्णालये, चित्रपटगृहे, बंदिस्त सभागृहे, मॉल्स आदी ठिकाणी मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्थात मास्क सक्तीची शिफारस केलेली नाही..
– सध्या कोरोना रुग्णांमध्ये तापाचे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे सर्व डॉक्टरांनी 99 अंश किंवा त्याहून अधिक ताप असलेल्या रुग्णांची योग्य दखल घेणं गरजेचं आहे.

– कोरोना रोखण्यासाठी संशयित रुग्णांच्या कोविड चाचण्या वाढवाव्यात, एखाद्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी केली पाहिजे.
– कोरोनाबाधित व्यक्तींना ‘होम क्वारंटाइन’ करणं गरजेचं आहे.. शिवाय, 50 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, कोमॉर्बिड आणि लसीकरण न झालेल्या लाेकांची अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.

– खोकला, श्वास लागणे, ताप कायम राहणे, आवाज बदलणे व घसा खवखवणे, यांसारखी अतिरिक्त लक्षणे दिसल्यास संबंधित रुग्णास हाॅस्पिटलमध्येच दाखल करणे योग्य राहील.
– रुग्णांना सतत उच्च पातळीचा ताप किंवा आजाराची लक्षणे 48 तास दिसत आहेत, ज्यांचे वय 50 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा रुग्णांना ‘मोलनुपिरावीर’ हे औषध दिलं जाऊ शकतं. मात्र, गरोदर महिलांना हे औषध देऊ नये, अशी शिफारस केली आहे.

मंगळवारीही कोरोनाचा विस्फोट

राज्यात आजही (मंगळवारी) कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यांचा उच्चांक गाठला. मंगळवारी राज्यात तब्बल 1881 रुग्ण आढळले. त्यात एकट्या मुंबईतच 1242 रुग्णांची नोंद झाली. तसेच 878 रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनामुळे राज्यात आज एकही मृत्यू झालेला नाही..

Post a Comment

0 Comments