google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली जवळा विकास सेवा सोसायटी निवडणूक दिपकआबा यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध

Breaking News

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली जवळा विकास सेवा सोसायटी निवडणूक दिपकआबा यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध

 स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली जवळा विकास सेवा सोसायटी निवडणूक दिपकआबा यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध

महाराष्ट्र राज्यातील पहिल्या तीन क्रमांकामध्ये जवळा विकास सेवा सोसायटचा नंबर

दीपकआबांमुळे जवळा सोसायटीची बिनविरोध परंपरा कायम 


सांगोला तालुक्याचे माजी आमदार कै.काकासाहेब साळुंखे-पाटील व कै.अण्णासाहेब घुले (सरकार) तसेच कै.शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्यानंतर 40 वर्षापासून दीपकआबा यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यपूर्व काळापासून जवळा विकास सेवा सोसायटीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखण्याचं काम महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा माजी विधानपरिषद सदस्य दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आजतागायत केले आहे.


जवळा विकास सेवा सोसायटीची सुसज्ज इमारत असल्याने भविष्य काळामध्ये संस्थेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करणार आहे. – दीपकआबा साळुंखे -पाटील

100% वसुलीची परंपरा

दिपकआबा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या जीवनातील परिवर्तन घडविणाऱ्या जवळा विकास सेवा सोसायटीचा 100% वसुलीची परंपरा कायम राखल्याने जवळा विकास सेवा सोसायटीचा महाराष्ट्र राज्यामध्ये नावलौकिक असून, सबंध महाराष्ट्रामध्ये पिग्मी गोळा करणारी एकमेव सोसायटी तसेच गोल्ड लोन तीन तासाच्या आत उपलब्ध करून देऊन राज्यातील एक आदर्श विकास सेवा सोसायटी होण्याचा मान जवळा विकास सेवा सोसायटीला निश्चितपणे दिपकआबा यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेला आहे.


सुसज्ज इमारत

जवळा विकास सेवा सोसायटीची सुसज्ज इमारत असल्याने भविष्य काळामध्ये संस्थेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन विकास सेवा सोसायटी पूर्णत्वाला नेणार असल्याचा मानस दिपक आबा यांनी यावेळी बोलताना सांगितला.भविष्यकाळातही जवळा विकास सेवा सोसायटीची सुसज्ज अशी इमारत उभा करून संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताची कामे करणार असल्याचा मानस दिपकआबा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.


मागेल तेव्हा कर्ज

गेली चाळीस वर्ष पक्ष पार्टी न पाहता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विकास सेवा सोसायटीची भूमिका ही अग्रेसर असते.सर्व पक्षांना एकत्रित घेऊन संस्थेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शी ठेवण्याचं काम संस्थेचे सचिव हेमंत कुलकर्णी यांच्या कार्यकुशल कामामुळे होत असून शेतकऱ्यांना मागेल तेव्हा कर्ज याची तंतोतंत पणे पूर्तता होत असल्याने संस्थेच्या सचिवांचा या संस्थेमध्ये सिंहाचा वाटा आहे .

Post a Comment

0 Comments