दुःखद : नमस्कार….!आजच्या ठळक बातम्या, दूरदर्शन वरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला, ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या, अशी बुलद आवाजात दूरदर्शनवरील बातमीपत्राची सुरुवात करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज निधन झाले आहे. बातम्या सांगण्याची खास शैली आणि भारदस्त आवाज यामुळे ते दूरदर्शनवरील बातम्यांची ओळख बनले होते. प्रदीप भिडे यांच्यावर आज संध्याकाळी 6 वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
24 तास बातम्या देणाऱ्या वाहिन्यांचा जमाना येण्यापूर्वी एकेकाळी बातम्या देणारे दूरदर्शन हे एकमेव दृकश्राव्य माध्यम असताना प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रामध्ये आपली खास अशी ओळख निर्माण केली होती. 1972 मध्ये दूरदर्शनमध्ये प्रवेश केल्यानंतर 1974 पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली होती.
तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले होते. त्यांनी राज्य आणि देशातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडीं वेळी केलेले वृत्तनिवेदन अजूनही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.


0 Comments