google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बहुजन मुक्ती पार्टी चे माजी तालुकाध्यक्ष कमरुद्दीन काझी व इतर कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.

Breaking News

बहुजन मुक्ती पार्टी चे माजी तालुकाध्यक्ष कमरुद्दीन काझी व इतर कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.

 बहुजन मुक्ती पार्टी चे माजी तालुकाध्यक्ष कमरुद्दीन काझी व इतर कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश.

सांगोला( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज)- बहुजन मुक्ती पार्टी चे माजी तालुकाध्यक्ष कमरुद्दीन काझी व महिला सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भोकरे व सामाजिक कार्यकर्ते किरण बनसोडे इत्यादी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

  

     सोलापूर जिल्हा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पक्षवाढीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये बैठकीचे आयोजन केले जात आहे. माननीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी जोरदार कामाला सुरुवात झालेली आहे. याचाच भाग म्हणून सांगोला तालुक्यांमध्ये वंचित बहुजन आघाडी ची बैठक व जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तालुकाध्यक्ष विकास बनसोडे व जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ गुळीग यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित केली होती यावेळी सांगोला तालुक्यातील बहुजन मुक्ती पार्टी चे माजी तालुकाध्यक्ष  कमरुद्दीन काझी  यांनी व सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भोकरे , कार्यकर्ते किरण बनसोडे त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकारी यांचा पुष्पहार हार घालून सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


         "वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी वेळोवेळी मुस्लिम समाजाबद्दल घेतलेली चांगली व ऐक्याची भूमिका पाहून मी या वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडे आकर्षित झालो असून बाळासाहेबांचे विचार मुस्लिम समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत  पक्षाची ध्येयधोरणे पोचवण्याचे काम मी करणार असून तालुक्यातील जास्तीत जास्त मुस्लिम समाजातील कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत कमरुद्दीन काझी यांनी व्यक्त केले".

 

      यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण सर, जिल्हा उपाध्यक्ष लालासाहेब मुलानी, जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ गुळीग, टेंभुर्णी चे जिल्हा उपाध्यक्ष दीपक चव्हाण, सांगोल्याचे तालुका अध्यक्ष विकास बनसोडे, तालुका महासचिव सुनील काटे, सांगोला तालुका संघटक अहमद सय्यद, महिम चे शाखाध्यक्ष दीपक कांबळे, वैशाली भोकरे , कमरुद्दीन काझी , पत्रकार संतोष साठे ,किरण बनसोडे यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments