google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अवैध गॅस सिलिंडर प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला नेत्याविरुद्ध गुन्हा !

Breaking News

अवैध गॅस सिलिंडर प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला नेत्याविरुद्ध गुन्हा !

 अवैध गॅस सिलिंडर प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला नेत्याविरुद्ध गुन्हा !

सोलापूर : घरगुती वापराचा गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून विक्री केली जात असल्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांच्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. 


घरगुती गॅस आणि कमर्शियल गॅस यांच्या दरात मोठी तफावत असल्यामुळे अनेकदा घरगुती गॅसचा गैरवापर करण्यात येत असल्याचा घटना समोर येतात. शिवाय अवैधरित्या सिलिंडरमध्ये गॅस भरण्याच्या प्रकारात मोठे अपघात देखील झालेले आहेत. सदर गुन्हेगारी कृत्य करताना स्फोट होण्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत तरीही अनेकजण हा बेकायदा उदयॊग करीत असल्याचे दिसत आहे. सोलापूर येथे सिद्धेश्वर नगरात अशाच प्रकारे घरगुती वापराराच्या गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या तब्बल ७९ गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सदर प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा विद्या लोलगे यांच्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जाकीर अब्दुल सत्तार सय्यद यास अटक देखील करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील मंगल भांडारचाय बाजूलाच अवैध गॅस सिलिंडर ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांना या छाप्यात अवैध गॅस सिलिंडर आढळून आले.  एका पत्रा शेडच्या आतील बाजूस एलपीजी गॅस भरलेले ४० आणि रिकामे ३९ गॅस सिलिंडर असल्याचे पोलिसांना दिसून आले.   

सोलापूर शहरात इंडियन ऑइलच्या तीन गॅस एजन्सी आहेत, आमच्या एजन्सीमार्फत कुटुंबाला गॅस सिलेंडर दिले जाते परंतु त्याचे पुढे काय होते हे आम्हाला माहीत नाही. सदर प्रकरणात आपले नाव कसे जोडण्यात आले हे समजत नाही. संबंधित अधिकाऱ्यांची भेट आपण घेणार आहोत असे राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या लोलगे यांनी सांगितले आहे 

साहित्यही आढळले !

इलेक्ट्रिक मोटारच्या साहाय्याने व्यावसायिक सिलिंडरमध्ये घरगुती वापराचा गॅस भरला जात होता. या ठिकाणी नोझल स्वीच, इलेक्ट्रिक वजन काटा, रिक्षाचे जुने टायर, इलेक्ट्रिक बोर्ड अशा काही वस्तूसह इण्डेन कंपनीचे ७९ सिलेंडर जप्त करण्यात आले आहे. एकूण १ लाख ३८ हजार २७२ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 


विद्या लोलगे विरुद्ध गुन्हा 

राजकारणासह सामाजिक कार्यात देखील आघाडीवर असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या लोलगे यांच्यासह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडणे स्वाभाविक आहे. गॅस दरवाढीच्या विरोधात देखील त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलेले होते. अनेक सामाजिक प्रश्नात देखील त्या आवाज उठवत असतात.  

Post a Comment

0 Comments