google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आजोबांनीच केला 13 वर्षीय नातीवर लैंगिक बलात्कार!

Breaking News

आजोबांनीच केला 13 वर्षीय नातीवर लैंगिक बलात्कार!

 आजोबांनीच केला 13 वर्षीय नातीवर लैंगिक बलात्कार!

नागपूर: कपिलनगर पोलीस स्टेशन अंतर्गत अल्पवयीन 13 वर्षीय मुलीवर तिच्या आजोबांनी लैंगिक बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपिविरुद्धात पॉक्सो आणि आयपीसीच्या कलम 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.


याबद्दल अधिक माहिती अशी कि, पीडित मुलीची आई गर्भवती असल्याने ती सध्या आपल्या माहेरी आली होती. ती गर्भवती असल्यामुळे मुलीला आजोबांकडे झोपायला पाठवत होती. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आईने आजोबा आणि नात दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. 


त्यानंतर कुटुंबात या विषयावर चर्चा झाली. परंतु, कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने पीडितेच्या आईला सर्वांनी गप्प बसवले. परंतु, अखेरीस पीडितेने आणि तिच्या आईने पोलीस तक्रार देण्याचे निर्णय घेतला.दरम्यान, सोमवारी (6 जून) कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये पीडितेच्या आजोबाविरोधात पॉक्सो आणि आयपीसीच्या कलम 376 अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

0 Comments