google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 12वी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर? कुठे पाहता येणार निकाल, वाचा..

Breaking News

12वी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर? कुठे पाहता येणार निकाल, वाचा..

 12वी बोर्डाच्या निकालाची तारीख जाहीर? कुठे पाहता येणार निकाल, वाचा..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून  घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आणि पालक आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनानंतर बारावीच्या झालेल्या परिक्षांमुळे यंदाच्या निकालाची सगळेच उत्सुकतेने वाट पाहात आहेत. आता निकालाविषयी मोठी बातमी समोर आली आहे.


शिक्षणमंत्र्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करू, असं सांगितलं होतं. आता बारावी परीक्षेचे पेपर तपासणीचं कामही व्यवस्थितपणे पार पडल्याची माहीती राज्य शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावीं यांनी दिली आहे. याशिवाय आता मिळालेल्या माहीतीनुसार, बारावीचा निकाल उद्या (ता. 8 जून) जाहीर होण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडुन घेण्यात आलेल्या बारावी परिक्षांचा निकाल विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे बारावीचा निकाल उद्या जाहीर होईल. उद्या 8 जून रोजी दुपारी एक वाजता 12वी चा निकाल लागणार (Maharashtra 12th Result 2022) असल्याची माहीती मिळाली आहे.


12वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्याकरता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर बघायला मिळणार आहे.


तुम्ही उद्या www.mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या वेबसाईटला भेट देऊन निकाल पाहू शकता.


विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी परीक्षेवेळी वापरलेला सीट नंबर/ रोल नंबर आणि विद्यार्थ्याच्या आईचं नाव अशी माहीती आवश्यक असणार आहे.


ऑनलाईन पद्धतीनं इंटरनेटवर निकाल पाहिला की प्रिंट आऊट नक्की घ्या, म्हणजे इतरत्र उपयोग होईल.

Post a Comment

0 Comments