google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथे आज शिवसंपर्क अभियानाचे आयोजन

Breaking News

सांगोला येथे आज शिवसंपर्क अभियानाचे आयोजन

 सांगोला येथे आज शिवसंपर्क अभियानाचे आयोजन 

 सांगोला/ प्रतिनिधी. शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेने केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेना पक्षाने शिव संपर्क अभियानाची सुरुवात केली आहे



 या अभियानाची सुरुवात सांगोला तालुक्यांमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबई येथील नगरसेवक अनिल कोकीळ, विनय चऊळकर, सचिन कांबळे, हे सांगोला तालुक्यातील शिवसैनिकांच्या संपर्कात असून राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोचण्यासाठी आज दिनांक २९ मे रोजी सकाळी ११ वाजता सांगोला शहरात राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे शिवसंपर्क अभियान आयोजित केले आहे या शिवसंपर्क अभियानासाठी 


सांगोला तालुक्याचे आमदार  शहाजीबापू पाटील, शिवसेना नेते शिवाजी सावंत, भाऊसाहेब रुपनर,मुबंई येथील शिवसेना नगरसेवक अनिल  कोकीळ, विनय चऊळकर,सचिन कांबळे, सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजीराजे शिंदे, हे उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख सुर्यकांत घाडगे यांनी दिली तसेच सांगोला तालुक्यातील बहुसंख्य  शिवसैनिकांनी या शिवसंपर्क अभियानासाठी उपस्थित रहावे असे आवाहन  शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments