google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी: पोलीस भरतीची तारीख ठरली

Breaking News

मोठी बातमी: पोलीस भरतीची तारीख ठरली

 मोठी बातमी: पोलीस भरतीची तारीख ठरली

महाराष्ट्र : पोलीस भरतीची आतुरतेने वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली आहे. राज्यात येत्या 15 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून त्याअंतर्गत विविध पदांसाठी सुमारे 7 हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. एवढच नाही तर, मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर भविष्यात 15 हजार जागांसाठीचीही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचं वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.


मागील काही वर्षांपासून राज्यात पोलीस भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे पोलीस भरती नेमकी कधी होणार? असा प्रश्न भरतीची तयारी करणाऱ्या व्यक्तींना पडला होता. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील तरूण पोलीस भरती प्रक्रिया लवकर येण्याची वाट बघत होते. म्हणून राज्यात येत्या 15 जूनपासून विविध पदांसाठी सुमारे 7 हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.


पोलिसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय त्यांच्या बदल्या करण्यात येणार नाहीत. परंतु, प्रशासकीयदृष्ट्या आवश्याक तेव्हा हा निर्णय घ्यावा लागेल. पोलिस निरीक्षक पदापर्यंतच्या बदल्यांचा अधिकार पोलिस महासंचालकांना आहे. पोलिस उपअधिक्षक पदाच्या बदल्यांचे अधिकार मंत्र्यांना आहेत. भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत.

Post a Comment

0 Comments