google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हा परिषदेत 13,521 जागांसाठी भरती होणार..? सामान्य प्रशासन विभागाची परवानगी..!

Breaking News

जिल्हा परिषदेत 13,521 जागांसाठी भरती होणार..? सामान्य प्रशासन विभागाची परवानगी..!

 जिल्हा परिषदेत 13,521 जागांसाठी भरती होणार..? सामान्य प्रशासन विभागाची परवानगी..!

राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना, तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी विभागातील रिक्त जागा भरण्यासाठी मेगाभरतीची घोषणा केली होती. त्यात जिल्हा परिषदेमधील तब्बल 13,521 जागांचाही समावेश होता. या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली होती.


मार्च 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या या भरतीसाठी तब्बल 20 लाखांवर अर्ज आले होते. या भरतीसाठी प्रत्येक उमेदवाराने 3 ते 4 हजार रुपये खर्च करून विविध पदांसाठी अर्ज केले. मात्र, नंतर तांत्रिक कारणांनी ही भरती प्रक्रिया रखडली.


दरम्यान, ठाकरे सरकारने आता सरकारी नोकर भरतीवरील निर्बंध हटवले आहेत. विविध सरकारी विभागातील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. सामान्य प्रशासन विभागाने जिल्हा परिषदेतील रिक्त जागांच्या भरतीसाठीही परवानगी दिली आहे.


गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली जिल्हा परिषदेची पदभरती लवकरच होणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समजली.

’ संकेतस्थळ बंद झाल्याने राज्य सरकारने  जिल्हा परिषद भरतीच्या परीक्षेसाठी चार खासगी कंपन्यांची निवड केली. त्यातील ‘न्यासा’ कंपनीसोबत ग्रामविकास विभागाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली होती.


दरम्यान, नंतरच्या काळात सरकारने ‘न्यासा’ कंपनीसोबतचा करार रद्द केला. नंतर शासनाने नव्याने तीन कंपन्यांची परीक्षा घेण्यासाठी निवड केली. या तीन पैकी एका कंपनीची निवड करुन ही परीक्षा घेण्याची सूचना राज्य सरकारने ग्रामविकास व पंचायत राज विभागाला केली आहे.

‘या’ पदांसाठी होणार भरती

कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, विस्तार अधिकारी, कृषी व सांख्यिकी, स्थापत्य सहायक, पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ सहायक (लेखा), वरिष्ठ सहायक (लिपिक), अंगणवाडी पर्यवेक्षक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी.


राज्य सरकारने 3 मार्च 2019 रोजी काढलेल्या जाहिरातीनुसार, राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये वरील पदांच्या 13,521 जागांसाठी भरती होणार आहे. जिल्हानिहाय जागा खालीलप्रमाणे :


जिल्हानिहाय रिक्त जागा

– अहमदनगर – 729

– अमरावती – 463

– अकोला – 242

– औरंगाबाद – 362

– भंडारा – 142

– बीड – 456

– चंद्रपूर – 323

– गोंदिया – 257

– गडचिरोली – 335

– हिंगोली – 150

– नाशिक – 687

– लातूर – 286

– नंदुरबार – 333

– पालघर – 708

– परभणी – 259

– रायगड – 510

– सातारा – 708

– नागपूर – 418

– पुणे – 595

– बुलडाणा – 332

– वाशिम – 182

– यवतमाळ – 505

– जालना – 328

– उस्मानाबाद – 320

– ठाणे – 196

– नांदेड – 557

– रत्नागिरी – 466

– सिंधुदुर्ग – 162

– धुळे – 219

– वर्धा – 267

– जळगाव – 607

– कोल्हापूर – 532

– सांगली – 471

– सोलापूर – 414

Post a Comment

0 Comments