म्हणून अहमदनगर जिल्ह्यात मंकीपॉक्सची दहशत; ‘त्यांची’ होणार तपासणी
अहमदनगर : सुमारे दोन ते तीन वर्षे कोरोनाने संपूर्ण जग हैराण झाले होते. मात्र सद्या जगातील बहूतांशी देशात कोरोना संक्रमण फैलाव मंदावला आहे. मात्र आता आणखी एका आजारानं जगाची धाकधूक वाढवली आहे. कारण बेल्जियम, अमेरिका, ब्रिटन या देशात मंकीपॉक्सने आपले पाय चांगलेच रोवले आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातही यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
यां व्हायरसचा एकही रुग्ण भारतात आढळून आलेला नाही. मात्र तरीही राज्य सरकारच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा देखील अलर्ट झाला आहे. जिल्ह्यातील सर्वात गजबजलेले एअरपोर्ट असलेल्या शिर्डीत प्रशासनाने कंबर कसली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील एअरपोर्टवर कोविडमध्ये ज्या प्रकारे प्रवाश्यांची तपासणी केली गेली होती, तशाच प्रकारची मंकीपॉक्सची तपासणी करण्यात येणार आहे. एअरपोर्टवर बाहेर राज्यातून किंवा देशातून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीमध्ये लक्षणे आढळून आल्यास संबंधितास विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने म्हटले आहे की, मंकीपॉक्स विषाणूच्या 20 पेक्षा जास्त देशांमध्ये 200 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. तसेच 100 पेक्षा जास्त संशयित प्रकरणे आढळली आहे. या आजाराचा वेगाने होत असलेला प्रसार पाहता जागतिक आरोग्य संस्थेने राष्ट्रांना संसर्गजन्य रोगावर पाळत ठेवण्याचे आवाहन केले आहे.


0 Comments