google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 १९ कोटी ४०लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे आज होणार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व उदघाट्न

Breaking News

१९ कोटी ४०लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे आज होणार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते भूमिपूजन व उदघाट्न

 १९ कोटी ४०लाख रुपये निधीच्या विविध विकास कामांचे आज होणार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते  भूमिपूजन व उदघाट्न


माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील व प्रा झपके सर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती.

 सांगोला /प्रतिनिधी. मागील अडीच वर्षापासून सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भरघोस निधी खेचून आणला त्या निधीतून मंजूर झालेल्या व सध्या कामे पूर्ण असलेल्या कामांचे उदघाट्न  व नव्याने मंजूर असलेल्या कामांचे  भूमिपूजन सांगोला शहर व महुद बु  महिम गावात आज दि २८ मे शनिवार रोजी होणार आहे संपूर्ण सांगोला तालुक्याच्या शेतीच्या पाण्याच्या योजना व पिण्याच्या पाण्याच्या योजना मार्गी लागताना दिसत आहेत


 त्याचबरोबर नागरिकांसाठी मूलभूत पायाभूत सुविधामध्ये सुधारणा करण्यासाठी  आमदार शहाजीबापू पाटील यांनी भरघोस निधी उपलब्ध केला असून सांगोला येथील विश्रामगृह १००   वर्षे जुने होते त्या ठिकाण नवीन प्रशस्त सोयी सुविधासह ६ कक्षाची विश्रामगृहची नवीन इमारत,तालुक्यातील छोटे व मोठे रस्ते व पुलांची कामे  उत्कृष्ट व दर्जेदार करणे त्याच बरोबर विविध समाजांच्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमासाठी सभामंडप  सभागृहे  यांची निर्मिती करणे यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भर दिलेल्या  दिसून येत आहे  या सर्व कामांच्या करता महाविकास आघाडीकडून भरघोस निधी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदार संघातील गावांच्या विविध विकास  कामांसाठी आणला आहे.


 आमदार फंडातून मंजूर असणाऱ्या महुद बुद्रुक येथील संत बाळूमामा मंदिरा समोर सभामंडप बांधणे मंजूर निधी १०लाख रुपये,  महुद येथील विठ्ठलवाडी येथे  मरीआई मंदिरासमोर सभामंडप मंजूर निधी ५लाख  , महुद बुद्रुक येथील चर्मकार वस्ती येथे चर्मकार मंदिरासमोर  सभामंडप बांधणे  मंजूर निधी १०लाख रुपये  महुद बुद्रुक येथील  रामोशी वस्ती येथे खंडोबा मंदिरा  समोर  सभामंडप  मंजूर निधी १० लाख   , महुद बुद्रुक येथील  मुस्लिम दफनभूमी येथे नदीकाठावर भिंत बांधणे व कब्रस्तान दुरुस्ती कब्रस्तान हॉल वअंतर्गत रस्ता करणे  मंजूर निधी ३० लाख रुपये , महुद बुद्रुक येथील  रुद्र पशुपती कोळेकर महाराज यांच्या मठा समोर सभामंडप बांधणे मंजूर निधी १०लाख रुपये  , महुद बुद्रुक येथील लिंगायत स्मशानभूमी येथे संरक्षक भिंत बांधणे मंजूर निधी १०लाख रुपये महुद बुद्रुक येथील टिंगरेवस्ती येथे दत्त मंदिरा समोर सभामंडप बांधणे मंजूर निधी १० लाख रुपये , महुद बुद्रुक येथील गार्डी फाटा खांडेकर वस्ती मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे मंजुर निधी  १० लाख रुपये  ,  महिम ते गार्डी रस्ता करणे मंजूर निधी ५७ लाख , महिम येथील स्मशानभूमीजवळ ३०५४ विशेष पुरहानी  दुरूस्ती अंतर्गत  मंजूर निधी३ कोटी   , महिम येथील महिम ते तांदुळवाडी रस्ता मंजूर निधी ५७ लाख  , महीम येथील महिम ते कोळेगाव रस्ता करणे मंजूर निधी २९लाख व सांगोला शहर येथील महूद रोड येथील नवीन विश्रामगृह इमारत बांधकाम मंजूर निधी २कोटी २०लाख या कामाचेभूमिपूजन.


 तसेच महुद बुद्रुक येथील  खंडोबा मंदिराजवळ कासाळ  ओढ्यावर नाबार्ड- २६ अंतर्गत  ३ कोटी २० लाख रुपयांच्या निधीतून  बांधलेल्या मोठ्या पुलाचे व जिल्हा परिषद कडील महूद गार्डी रस्त्यावरील विशेष पूरहानी अंतर्गत रु ४०लाख पुलाचे  सांगोला शहर येथे  तहसील कार्यालयाच्या पाठीमाघे रु १ कोटी ३० लाख निधीमधून पुर्ण झालेल्या  दुय्यम निबंधक कार्यालय इमारतीचे,  सांगोला शहर येथील खोपटे वस्ती  वस्तीजवळ सांगोला इमडे वाडी लक्ष्मी दहिवडी रस्ता माणनदीवर रु६ कोटी ८८ लाख निधी खर्चून बांधलेल्या मोठ्या पुलाचे उदघाट्न सांगोला तालुक्याचे 


आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते  व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  प्रा प्रबुद्धचंद्र झपके सर, शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी गायकवाड, किसान आर्मीचे    प्रफुल्ल  कदम , तानाजीकाका पाटील,  शिवसेना तालुका प्रमुख सूर्यकांत घाडगे,  राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मधुकर बनसोडे,  राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनिल भोरे  या मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांनी दिली..

Post a Comment

0 Comments