PM किसान : ‘ओटीपी’द्वारे ई-केवायसी प्रक्रिया तात्पुरती स्थगित
पंतप्रधान किसान सन्मान निधीबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे . ज्या अंतर्गत किसान निधीच्या पात्र शेतकऱ्यांसाठी अनिवार्य ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 22 मेपर्यंत वाढवण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये केंद्र सरकारने मोबाईल नंबरवर येणार्या ओटीपीद्वारे ई-केवायसीची सुविधा तात्पुरती स्थगित केली आहे.
काही दिवस शेतकरी मोबाईल ओटीपीद्वारे ई-केवायसी करू शकणार नाहीत. केंद्र सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे, परंतु किसान पोर्टलवर ई-केवायसीचा पर्याय उपलब्ध नाही. यानंतर आता शेतकऱ्यांना बायोमेट्रिक ई-केवायसी करावे लागणार आहे. पीएम किसान निधीच्या वेबसाइटवरही या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे. ज्यानुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. ओटीपी प्रमाणीकरणाद्वारे आधार आधारित ई-केवायसी तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या केंद्रांशी संपर्क साधा. बायोमेट्रिक ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या संगणक केंद्रात जावे लागेल.
या अंतर्गत शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याबाबत संगणक ऑपरेटरला माहिती द्यावी लागेल. यादरम्यान शेतकऱ्याला आधार कार्ड किंवा आधार क्रमांक सोबत ठेवावा लागेल. ज्यामध्ये ऑपरेटर बायोमेट्रिक मशिनद्वारे रेकॉर्ड केलेला अंगठ्याचा ठसा शेतकऱ्याच्या अंगठ्याशी जुळवणार आहे. जुळणी योग्य असल्यास ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.


0 Comments