google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गळा आवळून बायकोनं नवऱ्याला संपवलं! हत्येआधी पतीला इलेक्ट्रीक पोलला लटकवलं पत्नीनं केली पतीची हत्या

Breaking News

गळा आवळून बायकोनं नवऱ्याला संपवलं! हत्येआधी पतीला इलेक्ट्रीक पोलला लटकवलं पत्नीनं केली पतीची हत्या

 गळा आवळून बायकोनं नवऱ्याला संपवलं! हत्येआधी पतीला इलेक्ट्रीक पोलला लटकवलं पत्नीनं केली पतीची हत्या

अमरावती : दारु पिऊन त्रास देतो म्हणून पतीची हत्या  करण्यात आली आहे. पत्नीनं गळा आवळून आपल्याच पतीचा जीव घेतला आहे. अमरावती जिल्हा या हत्येच्या घटनेनं हादरुन गेला आहे. अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील मोझरी गावात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिस या हत्येप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दारु पिऊन  पती माहेरी येऊन सतत महिलेला त्रास देत होता,


 असा आरोप करण्यात आला आहे. पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीनं पतीला इलेक्ट्रीक खांबाला बांधलं. त्यानंतर पतीची गळा आवळून हत्या केली आहे. या हत्येनं मोझरी गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर परिसरातही भितीचे वातावरण पसरलं आहे. तर आता या दाम्पत्यांच्या मुलांचं काय होणाार? असाही सवाल आहे.


हत्येआधी काय घडलं?

पत्नी आपल्या माहेरी राहत होती. माहेरी राहून ही महिला एका कंपनीच काम करत होती. कंपनीतून मिळणाऱ्या पगारावर ही महिला आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करत होती. दरम्यान, सतत माहेरी येऊन या महिलेचा पती तिला त्रास देत होता. या पतीनं दारु पिऊन पत्नीला त्रास दिल्यामुळे तिनं टोकाचं पाऊल उचललं. हत्येआधी या महिलेनं आपल्या पतीचं शरीर एका खांबाला दोरखंडानं बांधून ठेवलं होतं. हत्येआधी तिचा पती दारु पिऊन आला असावा, अशीही शंका घेतली जातेय.


आरोपी महिलेचं नाव माधुरी सुनील वंजारी असं आहे. तिनं आपल्या पतीची गळा दाबून हत्या केली. हत्येआधी या महिलेनं आपल्या पतीला इलेक्ट्रीक खांबाला बांधलं होतं. त्यानंतर गळा आवळून माधुरी यांनी पती सुनील वंजारीचा जीव घेतला.


या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. ज्याची हत्या करण्यात आली तो सुनील वंजारी हा इसम पांढरी, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील आहे. 14 वर्षांपूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. या दाम्पत्याला दोन मुलं आहेत. आईनंच वडिलांचा जीव घेतल्यामुळे आत दोन मुलांचं काय होणार, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. पतीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक झालेल्या दोन मुलांवरचं छत्र हरपलंय.

Post a Comment

0 Comments