google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता?

Breaking News

झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता?

 झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका

ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता?

सांगोला तालुक्यात सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी वाढविल्या आहेत. ठिकठिकाणी कार्यक्रम होत आहेत. त्या त्या गावांतील कार्यकर्ते, गावपुढारी यांच्यावर जबाबदारी दिली जात आहे. निवडणुकीचा माहोल तयार होत आहे.

सांगोला/ सर्वोच्य न्यायालयातील ओबीसी आरक्षण मुद्दा निकाली लागेपर्यंत निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सध्या प्रशासक आहेत. हा आरक्षणाचा मुद्दा कधीही संपू शकतो. तरीही प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तविली गेली आहे.


वाढती लोकसंख्या, त्यामुळे गट आणि गण हे वाढलेले आहेत. त्यातच प्रशासनाने नव्याने गट, गणांची निर्मिती केली. पण सध्या हे गट, गण बरखास्त करण्यात आलेले आहेत. ज्यावेळी आरक्षणाचा प्रश्न निकाली, होईल त्यावेळी नव्याने रचना करण्याबाबत सूचना येथील. त्यानुसार नव्याने गट व गणांची रचना करण्यात येणार असल्याचे सांगितले.


सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या मुदती एक ते दीड महिन्यापूर्वी संपलेल्या आहेत. सध्या या सर्वांवरती प्रशासक आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रारूप प्रभागरचना तयार करून ती आयोगाला सादर केली होती. पण ओबीसी आरक्षणाचा विषय अद्याप मार्गी लागला नाही. शासनाने कायदा करून निवडणुकीचे अधिकार स्वतःकडे घेत प्रारूप प्रभाग रचना व गट रचना रद्द करण्याचे आदेश दिले होते.


त्यामुळे आता नव्याने गट व प्रभागाची रचना करण्यात येणार आहे.आयोगाच्या आदेशानुसार महसूल प्रशासनाने 79 जिल्हा परिषद गट,12 नगरपंचायती तसेच पंचायत समितीच्या गणांची नव्याने रचना व आदेश दिले होते. सदस्य संख्याही निश्चित केली होती. मंजुरीसाठी आयोगाला सादर करण्यात आले होते. पण ओबीसी आरक्षणावर अंतिम निर्णय झाला नसल्याने निवडणुका घ्यायच्या की नाही?याबाबत संभ्रम कायम होता. पण शासनाने कायदा करून निवडणुकीचे अधिकार स्वतःकडे घेत जिल्हा परिषदेचे गट,रचना रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या.


यामध्ये नगरपालिकेच्या नव्याने रचनेच्या याद्याही प्रसिद्ध ही केल्या होत्या. तर जिल्हा परिषदेच्या गट, गणांच्या याद्या निवडणूक आयोगाकडे सादर केल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यात गट आणि गण ही मोठ्या प्रमाणात वाढले होते. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ही रचना पुढाऱ्यांनीच मनमानी पद्धतीने केली होती. पण त्यांना सध्या तरी चपराक बसलेली आहे.सांगोला तालुक्यात एक गट आणि दोन पंचायत समितीचे गण वाढलेले होते.


नेत्यांच्या भेटीगाठी

सांगोला तालुक्यात सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी वाढविल्या आहेत. ठिकठिकाणी कार्यक्रम होत आहेत. त्या त्या गावांतील कार्यकर्ते, गावपुढारी यांच्यावर जबाबदारी दिली जात आहे. निवडणुकीचा माहोल तयार होत आहे.

Post a Comment

0 Comments