प्रलंबित रस्ता केसेस निकाली काढण्यासाठी ११ एप्रिलपासून मंडलनिहाय नियोजन - तहसीलदार अभिजीत पाटील
सांगोला (प्रतिनिधी):- कोरोना काळातील प्रलंबित रस्ता केसेस निकाली काढण्यासाठी सांगोला तालुक्यातील एकुण १० मंडलमध्ये दि. ११ ते दि. २६ एप्रिल दरम्यान नियोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अभिजित पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर जाण्यासाठी व शेतातील मालवाहतूक करण्यासाठी अतिक्रमणमुक्त रस्ते अत्यावश्यक आहेत. त्यासाठी गाव नकाशाप्रमाणे शेत रस्ते, गाडी रस्ते मोकळे करण्यात येणार आहेत.
प्रलंबित रस्ता केसेसचा निपटारा करण्यासाठी महूद – दिनांक ११ एप्रिल, शिवणे दिनांक १२ एप्रिल, संगेवाडी – दिनांक १३ एप्रिल सांगोला – दिनांक १८ एप्रिल, नाझरा – दिनांक १९ एप्रिल, – हातीद – दिनांक २० एप्रिल, सोनंद – – दिनांक २१ एप्रिल, घेरडी – दिनांक २२ एप्रिल, कोळा दिनांक २५ एप्रिल, जवळा – दिनांक २६ एप्रिल या पद्धतीने मंडल निहाय महसूल प्रशासनाने नियोजन केले आहे.
त्या अनुषंगाने मंडलनिहाय ठरवून दिलेल्या दिवशी प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार अभिजीत पाटील यांनी केले आहे.
गाव रस्ते, शेत रस्ते, शिवार रस्ते व पूर्वी प्रमाणे वहिवाटी खाली असणारे रस्ते मोकळे करून शेत जमिनीत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करू न यापुढील काळात महसूल प्रशासन पुढाकार घेणार आहे. या माध्यमातून रस्त्या संदर्भात निर्माण होणारे एकमेकातील वाद विवाद गावातच मिटवून सर्वांच्या सहकार्याने गावचा आणि तालुक्याचा विकास घडवून आणता येणार आहे. यातून शेतकरी सक्षम होण्यास मदत होईल असा विश्वास तहसीलदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला आहे.


0 Comments