शेकापपुढे सत्तास्थाने राखण्याचे आव्हान भाई गणपतराव देशमुख यांनी मोठ्या कष्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांवर शेकापचा झेंडा रोवला.
आता ते हयात नाहीत. त्यांच्या पश्चात प्रथमच शेकाप निवडणुकांना सामोरे जात आहे. विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांसह आगामी काळात येणाऱ्या इतरही निवडणुकांत शेकापची सत्तास्थाने राखण्यासाठी दोन्ही डॉक्टर बंधूंचा कस लागणार आहे.
सांगोला/ ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पंचायत समितीच्या सभापतींना जेवढे अधिकार आहेत, तेवढे अधिकार आमदारालाही नाहीत. अशातच गावोगावच्या सद्या 43 व त्यानंतर जशा याद्या प्रसिद्ध होतील, त्याप्रमाणे विकाससेवा सोसाट्याच्याही निवडणुका एप्रिल आणि मे 2022 मध्ये होणार आहेत.
येत्या काही दिवसात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही होणार आहेत. या सर्व सत्तास्थानांवर तालुक्यात वर्चस्व ठेवून असलेल्या शेकापपुढे आपला गढ अबाधित ठेवण्याचे आव्हान असणार आहे. माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेकाप प्रथमच या निवडणूक रणसंग्रामास सामोरे जात आहे.
विविध कार्यकारी सोसायट्यांच्या निवडणुकीसाठी सध्या तालुक्यात गावोगावी बैठका झडू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी अंतिम बैठकाही पार पडल्या आहेत.
विविध कार्यकारी सोसायट्यांतून शेतकऱ्यांना अल्प मुदतीसह, मध्यम मुदतीचे कर्ज मिळते. अश्यातच तालुक्यातील 81 संस्थांपैकी 54 सहकारी संस्थांवर शेकापचे वर्चस्व आहे. त्यामुळे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच या निवडणुका होत आहेत.
विशेष म्हणजे यावेळेस एकाचवेळी 43 संस्थांच्या निवडणुकाही होत आहेत. सांगोला तालुक्यात 81 विकाससेवा सोसायट्या आहेत. त्यापैकी 43 संस्थांचे प्रोग्राम जाहीर झाले आहेत. जसजशा याद्या येथील त्याप्रमाणे इतरही संस्थांच्या ह्या निवडणुका होणार आहेत. या कार्यक्रम जाहीर झालेल्या 43 संस्थांपैकी सर्वांची निवडणूक आठ-आठ दिवसाच्या फरकाने होणार आहेत.
निवडणुका होणारी गावे
नरळेवाडी, मानेगाव, वझरे, डिकसळ, चिणके, शिवणे, लोटेवाडी, लक्ष्मीनगर, घेरडी, पाचेगाव, चिकमहुद, अजनाळे, महिम, निजामपूर, कटफळ, शिरभावी, नाझरे, वाकी-शिवणे, जुजारपूर, तिप्पेहळ्ळी, बागलवाडी, खवासपूर, वाकीघेरडी, मेथवडे, धायटी, चिंचोली यासह अन्य सोसाट्याच्या निवडणुका आता लागलेल्या आहेत.
गेली कित्येक वर्षापासून सहकारी संस्थांवर शेकापचे वर्चस्व चांगलेच होते. आताही हे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी दोन्ही डॉक्टर बंधूंना जीवाचे रान करावे लागणार आहे.
पक्षीय बलाबल
यामध्ये प्रामुख्याने 52 च्या पुढे सोसायट्यावर शेकापचे वर्चस्व होते. राष्ट्रवादीच्या ताब्यात 18 सोसायट्या, शिवसेनेच्या 10 तर भाजपाची 1 सोसायटी असे वर्चस्व होते. पण सध्या तालुक्याची सत्ता शिवसेनेच्या हाती आहे. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीची तालुक्यात मोठी ताकद आहेत. अश्यातच परवाच चिणके विकाससेवा सोसायटीत नको तो प्रकार पहावयास मिळाला.
राष्ट्रवादीच्या ताब्यातही बऱ्याचशा ग्रामपंचायती असल्याने त्यांची बलस्थाने मजबूत आहेत. शेकापला मात्र पुन्हा हीच सत्तास्थाने आणण्यासाठी जोमाने कामाला लागले पाहिजे, हे निश्चित आहे.
डॉक्टर बंधूंचा कस लागणार
अख्या तालुक्याची शेकापची मदार ज्या दोन डॉक्टर बंधूवर आहे. त्या दोघांनाही चांगला परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. नवीन प्राप्त करणे नव्हे तर जुनी सत्तास्थाने टिकविण्यातच त्यांचा कसं लागणार आहेयेत्या काहीच दिवसात पंचायत समिती, जिल्हा परिषदा यांच्याही निवडणुका होत आहेत. सध्या 43 विकास सेवा सोसायट्यांच्या लागलेल्या आहेत. पंचायत समितीच्या मुदती 13 मार्च 2022 रोजी तर जिल्हा परिषदेच्या मुदती 21 मार्च 2022 रोजी संपलेल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना निवडणुकीसाठी वेळ मिळू शकतो.
स्व.आबासाहेबांच्या पश्चात पहिली निवडणूक
एकच पक्ष अन् एकच झेंडा अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यात स्व.आबासाहेबांच्या निधनानंतर प्रथमच ह्या निवडणुका होत आहेत. शेकापचे साम्राज्य राखण्यासाठी दोन्ही डॉक्टरांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी ज्येष्ठांची अपेक्षा आहे. कारण भाई गणपतराव देशमुख यांनी मोठ्या प्रयत्नाने ही सर्व सत्तास्थाने उभी केली आहेत.या सोसाट्याच्या निवडणुकानंतर येत्या काही दिवसातच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा निवडणुकाही होणार आहेत.
सोसाट्यात शेकाप अव्वलस्थानी
सांगोला तालुक्यात विकाससेवा सोसाट्यात शेकाप हा पक्ष अव्वलस्थानी आहे. गेली कित्येक वर्षापासून त्यांच्या ताब्यात ह्या संस्था असून आत्ताही 52 सोसाट्यावर याचेच अधिराज्य होते. याच निवडणुका आता होत आहेत. त्यामुळे तालुक्यातील जनतेलाही याची उत्सुकता आहे.


0 Comments