google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 'महाराष्ट्र श्री' राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत संकेत काळे याचे नेत्रदिपक यश

Breaking News

'महाराष्ट्र श्री' राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत संकेत काळे याचे नेत्रदिपक यश

 'महाराष्ट्र श्री' राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत संकेत काळे याचे नेत्रदिपक यश 

सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशन- रायगड व भारतीय जनता पार्टी, विचुंबे – पनवेल यांच्यावतीने नुकत्याच ८ वी वुमेन फिजिक, ५ वी मेन फिजिक आणि २ री क्लासिक बॉडी बिल्डींग आणि ५९ वी “महाराष्ट्र श्री” राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.


सांगोल्याचा सुपुत्र संकेत संजय काळे याने “महाराष्ट्र श्री” राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्य पदक मिळवित यशाची परंपरा कायम राखली आहे. यावेळी आमदार पै.महेशदादा लांडगे,आमदार प्रशांतदादा ठाकूर, छत्रपती पुरस्कार विजेते डॉ.संजय मोरे, मारुती अडकर, प्रमोद भिंगारकर आदी मान्यवरांनी संकेत चे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अतिशय कमी वेळात संकेत काळे याने बॉडी बिल्डिंग क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. संकेतचे १ ली ते १२ वी पर्यंतचे शिक्षण हे डोंगरगांव व सांगोला येथे झाले आहे. १२ वी नंतर तो बॉडी बिल्डिंग क्षेत्राकडे वळला. अवघ्या ४ ते ५ वर्षात त्याने जिल्हास्तरीय स्पर्धेपासून ते राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली. कौतुकाची बाब म्हणजे आतापर्यंत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकाविले आहे.


संकेत याने यापूर्वीही राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केले आहे. ज्युनियर मिस्टर इंडिया, ज्युनियर महाराष्ट्र श्री, राज्यस्तरीय विद्यापीठ बॉडीबिल्डिंग ९० किलो वजनी गटात दोन वेळा सुवर्ण पदक, पुणे विद्यापीठ झोनल स्पर्धेत २ वेळा


 सुवर्ण पदक, नॅशनल बॉडी २ बिल्डिंग स्पर्धेत दोन वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. अनेक जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग व पारितोषिके मिळविली आहेत. संकेत काळे याच्या कुटुंबाने त्याला त्याचे इच्छेप्रमाणे ‘बॉडी बिल्डिंग’ क्षेत्रात करियर करण्यास नेहमीच पाठबळ दिले आहे. संकेतने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments